GST कपातीनंतर सेकंड हँड कारच्या किंमतीही कोसळल्या; गाड्यांच्या बाजारात अनेक ऑफर्ससह मोठा डिस्काऊंट! जाणून घ्या सविस्तर
GST Impact on Used Cars: : अलिकडेच जाहीर झालेल्या GST 2.0 निर्णयामुळे भारतात कार आणि एसयूव्ही अधिक परवडणाऱ्या ठरल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाचे सर्व प्रमुख कार उत्पादकांनी स्वागत केले असून, त्यांनी त्यांच्या इस (इंटरनल कम्बशन इंजिन) मॉडेल्सच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन जीएसटी दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू झाले आहेत.

तर दुसरीकडे डीलर्सनी जुन्या मालकाकडून किंमत पाडून कार खरेदी केली होती, ती कार ते आता मोठी मार्जिन ठेवून विकत असल्याचे समोर आलं आहे. जीएसटीमध्ये बदल झाल्याने नव्या कोऱ्या वाहनांच्या किंमती कमालीची घसरल्या आहेत. नव्या कारच्या किंमतीच एक ते दीड लाखाने कमी झाल्याने सेकंड हँड कार डीलर्स, कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरु झाली आहे.

नव्या निर्णयानुसार जीएसटी कमी झाल्याने आता सेकंड हँड कारच्या मार्केटमध्येही डिस्काऊंट सुरु झाले आहेत. या डीलर्सला कारच्या किंमती कमी कराव्या लागल्या आहेत. स्पिनी, कार्स 24 सारख्या मोठमोठ्या ब्रँडनी जुन्या कारच्या किंमती दोन लाखांपर्यंत कमी केल्या आहेत. छोट्या, मोठ्या डीलर्सवरही याचा परिणाम होणार आहे.

परिणामी, जुन्या कारच्या विक्रीवरील जीएसटीमध्ये काही बदल झालेला नसले तरी नव्या कारच्या किंमती कमी झाल्याने आता त्या कमी झालेल्या रकमेपेक्षा जास्त किंमती कमी कराव्या लागल्या आहेत. याचा थेट परिणाम कार खरेदीवर पडला आहे. तर ग्राहकांचे कार घेण्याचे स्वप्न आता सत्यात उतरत असल्याचे चित्र आहे.
येथे प्रकाशितः 23 सप्टेंबर 2025 11:55 एएम (आयएसटी)
Comments are closed.