मोठी बातमी, जीएसटी फायलिंगची डेडलाइन काही तासांवर, पोर्टल डाऊन, उद्योग विश्वात चिंतेचं वातावरण
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीचं फायलिंग करताना अनेकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर जीएसटी पोर्टल डाऊन असल्याचं समोर आलं. जीएसटीचं दरमहा फायलिंग आणि तिमाही परतावा याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा वेळ राहिलेला असताना जीएसटी पोर्टल डाऊन झालं. यामुळं उद्योग क्षेत्रामध्ये चिंतेच वातावरण नि्रमाण झालं होतं. जीएसटी फायलिंगची शेवटची तारीख 11 जानेवारी आहे. त्यापूर्वी फायलिंग पूर्ण करण्यापूर्वी अनेकांना अडचणींना सामोरं जावं लागलं. अनेकांना लॉगीन देखील करता येत नव्हतं. गुरुवारपासून जीएसटीच्या पोर्टलला अडचणी असल्याची माहिती आहे.
प्रिय करदाते!📢
GST पोर्टलला सध्या तांत्रिक समस्या येत आहेत आणि त्याची देखभाल सुरू आहे. दुपारी 12:00 वाजेपर्यंत पोर्टल कार्यान्वित होईल अशी आमची अपेक्षा आहे. CBIC ला एक घटना अहवाल पाठवला जात आहे जेणेकरुन फाइल भरण्याच्या तारखेला मुदतवाढ द्यावी.
आपल्या समज आणि संयमाबद्दल धन्यवाद!
— जीएसटी टेक (@Infosys_GSTN) १० जानेवारी २०२५
बातमी अपडेट होत आहे…
अधिक पाहा..
Comments are closed.