जीएसटी सुधारणा लागू होताच 375 वस्तूंचे दर कमी होणार, कोणत्या वस्तूंचे दर घटणार जाणून घ्या
जीएसटी 2.0 नवी दिल्ली: GST 2.0 उद्या म्हणजेच 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. जीएसटी परिषदेनं 22 सप्टेंबरपासून 12 टक्के आणि 28 टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं घरातील किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, औषधं, ऑटोमोबाईलसह आणखी वस्तू स्वस्त होतील. जीएसटी रिफॉर्म्सनुसार 375 वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी होणार आहेत.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटीचे स्लॅब 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्क्यांवरुन कमी करुन 5 आणि 18 टक्के ठेवले आहेत. याशिवाय सिगारेट, तंबाखू, दारु यासारख्या गोष्टी 40 टक्के जीएसटीत आणलेत. वित्तमंत्री नि्र्मला सीतारामण यांनी जीएसटी सुधारणांचा निर्णय सामान्य आणि मध्यमवर्गाला दिलासा देणारा आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जीएसटी सुधारणांची घोषणा केली होती.
जीएसटी सुधारणांमुळं कोणत्या वस्तू स्वस्त होणार? GST Reforms impact on Price
उद्यापासून ऑटोमोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, किचनमधील आवश्यक वस्तू आणि औषधांसह 375 हून अधिक गोष्टींचे दर बदलणार आहेत.
दूध, कॉफी, कंडेंस्ड मिल्क, बिस्कीट,लोणी, धान्ये, कॉर्नफ्लेक्स, २० लिटरचा पाण्याचा जार, सुकामेवा, फळांचा रस, तूप, आईस्क्रीम, जाम आणि जेली, केचअप, स्नॅक्स, चीज, पेस्ट्री, सॉसेज आणि मीट, नारळ पाणी या सारख्या खाण्या पिण्याच्या गोष्टी स्वस्त होतील. याशिवाय आफ्टर-शेव लोशन, फेस क्रीम, फेस पाउडर, हेअर ऑयल, शाम्पू, शेविंग क्रीम, टॅल्कम पाऊडर, टूथब्रश आणि टॉयलेट सोपचे दर कमी होतील.
इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंमध्ये एअर कंडीशनर, डिशवॉशर, टीव्ही,वॉशिंग मशीनचे दर घटतील. औषधांच्या किमती देखील कमी होणार आहेत. डायग्नोस्टिक कीट, ग्लूकोमीटर यासारख्या उपकरणांवरील जीएसटी कमी करुन 5 टक्के करण्यात आली आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार सरकारनं औषधांच्या दुकानांना जीएसटी रिफॉर्म लक्षात घेत एमआरपीमध्ये बदल करुन किंवा औषधं कमी दरानं विकण्याचे निर्देश दिले आहेत. सलून, फिटनेस सेंटर, हेल्थ क्लब आणि योगासाठीच्या जीएसटीत देखील कपात करण्यात आलीय. ज्याचा फायदा लोकांना होईल.
सीमेंटवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन कमी करुन 18 टक्के करण्यात आली आहे. ज्यामुळं घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. यामुळं रिअल इस्टेट सेक्टरला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. जीएसटी सुधारणांमुळं ऑटो सेक्टरला सर्वाधिक फायदा होणार आहे. ज्यात सेस टॅक्स 35 ते 50 टक्क्यांनी कमी करुन 40 टक्के करण्यात आला आहे. जीएसटी सुधारणा जाहीर होताच अमूल, एचयूएल, लॉरियल आणि हिमालया यासरख्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.