पंत नावाचा नुसताच गाजावाजा, घरात घुसून गुजरातने नवाबांचा वाजवला बँड-बाजा! लखनऊच्या पराभवानंतर प

गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा IPL 2026 वर पराभव केला: आयपीएल 2026 मधील 19 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने यजमान लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) त्यांच्याच घरात धुव्वा उडवला. इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व गाजवत 7 विकेट्सने मोठा विजय मिळवला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत (Points Table) मोठी झेप घेतली आहे.

ऋषभ पंत पुन्हा नापास….

लखनऊची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. मिचेल मार्श अवघ्या 11 धावांवर बाद झाला, तर कर्णधार ऋषभ पंतने 18 धावांची खेळी केली. आयुष बदोनी (9), निकोलस पूरन (19) आणि अब्दुल समद (18) हेही फार मोठी खेळी करू शकले नाहीत. संघासाठी एडेन मार्करामने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 21 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकारासह 30 धावांची खेळी साकारली. त्याला मुकुल चौधरी (18), जॉर्ज लिंडे (16) आणि मोहम्मद शमी (12) यांची थोडीफार साथ मिळाली.

गुजरातच्या गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णा याने जबरदस्त कामगिरी करत लखनऊच्या फलंदाजीची कंबर मोडली. त्याने 4 षटकांत 28 धावा देत 4 महत्त्वाचे बळी घेतले. त्याने मार्कराम, बदोनी, पूरन आणि मुकुल चौधरी यांना बाद केले. त्याला अशोक शर्मा याचीही चांगली साथ मिळाली, अशोकने 4 षटकांत 32 धावा देत 2 बळी घेतले.

गिल आणि बटलरची फटकेबाजी

165 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातची सुरुवात जरी सावध झाली असली, तरी जोस बटलर आणि शुभमन गिलने एकदा लय पकडल्यानंतर लखनऊच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही. दोघांनी 58 चेंडूंमध्ये 84 धावांची भागीदारी केली. शुभमन गिलने 40 चेंडूंमध्ये सहा चौकार आणि एका षटकारासह 56 धावा केल्या. ऋषभ पंतच्या गोलंदाजीवर प्रिन्स यादवने शुभमनला यष्टीमागे झेलबाद केले. जोस बटलरने 37 चेंडूंमध्ये 11 चौकारांसह 60 धावांचे योगदान दिले. मोहम्मद शमीने बटलरची विकेट घेतली. बटलर बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (21 नाबाद) आणि राहुल तेवतिया (10 नाबाद) यांनी गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला.

गुणतालिकेत गुजरातची मोठी झेप

या विजयामुळे गुजरात टायटन्सच्या खात्यात आता 4 गुण जमा झाले असून त्यांनी गुणतालिकेत वरच्या स्थानावर झेप घेतली आहे. 4 सामन्यांपैकी 2 विजय आणि 2 पराभवांसह ते 4 गुण मिळवून पाचव्या क्रमांकावर आहेत. या विजयामुळे संघाचा नेट रनरेट देखील मोठ्या प्रमाणात सुधारला आहे, जो स्पर्धेच्या पुढील टप्प्यात महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे, लखनऊ सुपर जायंट्सनेही 4 सामन्यांतून 2 विजय मिळवत 4 गुण कमावले आहेत. गुणांच्या बाबतीत ते गुजरातच्या बरोबरीने असले तरी रनरेटमध्ये ते थोडे मागे पडले आहेत.

हे ही वाचा –

Asha Bhosle Death : असं वाटतंय जणू काळच थांबला..; आशाताईंच्या जाण्याने क्रिकेटचा देव गहिवरला, सचिनपासून ते युवीपर्यंत दिग्गजांचा कंठ दाटला

आणखी वाचा

Comments are closed.