Guillain Barre Syndrome pune a 37 year old man dies total number of patients also increased
गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुण्यात हातपाय पसरले आहेत. जीबीएसच्या रुग्ण संख्येत मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशात, एका 37 वर्षीय तरुणाचा जीबीएसच्या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृत रुग्णांची संख्या 7 वरती पोहोचली आहे.
Guillain Barre Syndrome पुणे : गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुण्यात हातपाय पसरले आहेत. जीबीएसच्या रुग्ण संख्येत मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या रुग्णांमुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशात, एका 37 वर्षीय तरुणाचा जीबीएसच्या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मृत रुग्णांची संख्या 7 वरती पोहोचली आहे. तसेच, सोमवार (10 फेब्रुवारी) जीबीएसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन आकडा 192 वर गेल्याची माहिती समोर येत आहे. (Guillain Barre Syndrome pune a 37 year old man dies total number of patients also increased)
मिळालेल्या माहितीनुसार, गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या 8 नवीन रुग्णांची नोंद पुण्यात झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 192 वर पोहोचली आहे. जीबीएसमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृत रुग्णांची संख्या 7 वरती पोहोचली आहे. त्यापैकी 6 मृत्यू पुणे जिल्ह्यातील आणि 1 मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील आहे. तसेच, जीबीएसच्या संक्रमणातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 91 असून या, रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 192 रुग्णांपैकी 91 रुग्ण महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. तसेच, 39 रुग्ण पुणे मनपा, 29 रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा, 25 रुग्ण पुणे ग्रामीण हद्दीतील आणि 8 रुग्ण इतर जिल्ह्यांमधील आहेत. सध्या 48 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील भागांत आणि जिल्ह्यातील बाधित भागांमध्ये सर्वेक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
जीबीएसमुळे 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू
बिबवेवाडीत राहणाऱ्या एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 31 जानेवारी रोजी या तरुणाला श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सांगलीत उपचारानंतर त्याची तब्येत ठीक झाली. परंतु, काही दिवसांत पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा या तरुणाला पुण्यातील कमला नेहरु रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. मात्र, उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती मृत्यू अहवालात देण्यात आली आहे.
हेही वाचा – Maharashtra Weather : नागरिकांनो काळजी घ्या, राज्यातील तापमानाचा पारा 30 अंशांवर
Comments are closed.