गुगुगुलाबराव पाटील….. आदित्य ठाकरेंनी विधानसभेतील भांडणाचा वचपा काढला, सभागृहाबाहेर शिंदेंच्य
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी काल (बुधवारी) सभागृहात शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं दिसून आलं. तुम्हाला खाते कळाले की नाही, असा शब्दांत आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटील यांना फटकारलं. त्यावर ‘मला हे खाते तुमच्या बापानेच दिले होते,’ असे प्रत्युत्तर पाटील यांनी देत ठाकरेंना डिवचलं. त्यानंतर ठाकरे यांनी ‘म्हणूनच तुम्ही पळून गेला होता,’ असा खोचक टोला लगावल्याने सभागृहातील वातावरण तापलं होतं आज देखील या दोघांमधील खडाजंगी पुन्हा सुरू असल्याचं दिसून येत आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आमदार आदित्या ठाकरे सभागृहाबाहेर बोलताना म्हणाले, काल पण मी सांगितलं होतं, मवाली आणि टपोरी भाषा सभागृहात वापरायची आणि गुगुलाबराव पाटील हे जसं बोलत होते त्यांनी वक्तव्य केले यांच्याच बापाने मला मंत्री बनवलं, म्हणजे त्यांनी मान्य केलं की, माझ्या वडिलांनी त्यांना मंत्रिपद दिलं. तरी बघा त्यांचे मन किती काळ आहे. तरी पण ते पळून गेले होते. त्यांचा घोटाळा काय होतं ते वर्षा बंगल्यात सांगितलं. त्यांनी आता जग जाहीरपणे सांगावं. जोडलेल्या पाईपलाईनमध्ये कुठल्या नळातून काय त्यांच्या घरी येतं, हे गुगुगुलाबराव पाटलांनी सांगावं, असं म्हणत पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांना डिवचलं आहे.
गुगुगुलाबराव पाटील हे बोलले बापाने मंत्री बनवलं मग आता… कुठल्या नळातून काय येतं हे त्यांनी सांगावं, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा गुलाबराव पाटलांना डिवचलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आज(गुरुवारी) पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांना धारेवर धरलं. “राज्याच्या मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करून यावे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तर तो प्रश्न राखून ठेवावा. मंत्र्याला सांगा, अभ्यास करून उत्तर द्या. पण यामुळे मंत्र्यांना त्यांचे खाते कळाले की नाही, हा प्रश्न उपस्थित होतो,” असं आदित्य ठाकरे म्हणालेत. तर गुगुगुलाबराव पाटील हे बोलले बापाने मंत्री बनवलं मग आता… कुठल्या नळातून काय येतं हे त्यांनी सांगावं, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा गुलाबराव पाटलांना डिवचलं आहे.
& nbsp;
गुलाबराव पाटील यांनी ‘बाप’ ऐवजी ‘वडील’ शब्द वापरुन सारवासारव
आदित्य ठाकरे यांची खोचक टीका गुलाबराव पाटील यांच्या चांगलीच वर्मी लागली होती. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी भर सभागृहात आदित्य ठाकरेंचा बाप काढला. अहो यांच्या बापाला कळालं होतं, म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी ‘बाप’ ऐवजी ‘वडील’ शब्द वापरुन सारवासारव केली. मात्र, या प्रसंगाची विधिमंडळात चांगलीच चर्चा रंगली होती.
आदित्य ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट
अधिवेशनाचे कामकाज सुरू असतानाच, आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर दोघांमध्ये झालेली ही चौथी भेट आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत आमदार वरुण सरदेसाई आणि सचिन अहिर उपस्थित होते. शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव फायनल केले आहे, त्याच अनुषंगाने ही भेट असल्याचे बोलले जात आहे.
Comments are closed.