गुलाबराव पाटील महाजनांना भेटण्यासाठी आले आणि लगेच निघून गेले, जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं
गुलाबराव पाटील : महापालिका निवडणुकींच्या (Maharashtra Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी युत्या आघाड्या करण्यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात देखील वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. महायुती चर्चेच्या निमित्ताने मंत्री गुलाबराव पाटील हे मंत्री गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी जळगाव शहरातील शासकीय विश्राम गृहात दाखल झाले होते. मात्र काही वेळातच ते विश्राम गृहातून बाहेर पडत,आपल्या वाहनात बसून निघून गेल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळं मंत्री गुलाबराव पाटील हे संतापून निघून गेल्याची चर्चा जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सुरु आहे.गुलाबराव पाटील नाराज झाले तरी त्यांची नाराजी आजच रात्री दूर होणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
जळगावमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची युती, पण जागा वाटपाचा पेट सुटेना
गेल्या काही दिवसापासून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची युती जाहीर करण्यात आली असली तरी जागा वाटपाचा बाबत अद्यापही तडजोड झाली नाही. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीत घ्यायचे तर कोणाच्या कोट्यातून त्यांना जागा द्यायच्या या बाबत भाजप आणि शिवसेनेत मतभेद असल्याच सांगितले जात आहे. त्यात आज मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत होणाऱ्या चर्चेत तोडगा निघेल आणि जागांचा तिढा सुटेल असे वाटले असतानाही तो आजही सुटू न शकल्याने मंत्री गुलाबराव पाटील हे काही वेळातच मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन,निघून गेलेत. ते संतापून निघून गेल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
गुलाबराव पाटील नाराज झाले तरी त्यांची नाराजी आजच रात्री दूर होणार
मंत्री गुलाबराव पाटील नाराज नाहीत, मात्र ते नाराज झाले तरी त्यांची नाराजी आजच रात्री दूर होणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मंत्री गिरीश महाजन हे मंत्री गुलाबराव पाटील यांची नाराजी कशी आणि कधी दूर करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या संदर्भात शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी मात्र गुलाबराव पाटील हे नाराज नव्हते, तर ते एका कार्यकर्त्याच्या घरी भेट देण्यासाठी तातडीने निघाल्याचे सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडुकांसाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 16 जानेवारीला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सातत्याने राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
आणखी वाचा
Comments are closed.