Gulabrao Patil claims that Sanjay Raut proposed to Eknath Shinde to hijack Shiv Sena


शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी शनिवारी (21 जून) शिवसेना फुटली तेव्हा सर्वात आधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतच फुटणार होते, असा दावा केला होता. यानंतर आज (22 जून) मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता, असा खळबळजनक दावा केला आहे.

मुंबई : शिवसेना पक्षाला फुटीला पुढील महिन्यात 3 वर्ष पूर्ण होणार आहे. मात्र शिवसेना पक्ष फुटीची चर्चा सुरू आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी शनिवारी (21 जून) शिवसेना फुटली तेव्हा सर्वात आधी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतच फुटणार होते, असा दावा केला होता. यानंतर आज (22 जून) मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता, असा खळबळजनक दावा केला आहे. (Gulabrao Patil claims that Sanjay Raut proposed to मराठी to hijack Shiv Sena)

शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार संजय राऊत हे दररोज शिवसेना शिंदे गटावर टीका करताना दिसतात. मात्र आता शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. यानंतर आज शहाजी बापू यांच्या वक्तव्याची री ओढत गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्या पुढे मांडला होता. परंतु त्यावेळी संजय राऊतांचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी नाकारला होता. जर एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव स्वीकारला असता, तर सर्वात आधी संजय राऊतच फुटणार होते, पण ते थांबले, अशा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : अबू आझमींचं वारीसंदर्भात वादग्रस्त विधान; फालतू वक्तव्य म्हणत फडणवीसांची टीका

शहाजीबापू पाटील यांनी काय दावा केला होता?

माध्यमांशी संवाद साधताना शहाजीबापू म्हणाले होते की, संजय राऊत यांना पण गुवाहाटीला यायचं होतं, पण त्यांना 30 ते 35 आमदारांचा विरोध होता. म्हणून संजय राऊत आजही चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. परंतु आजही उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य आहे. त्यामुळे लवकरच राजकीय घडामोडी घडतील, असा दावा देखील शहाजीबापू पाटील यांनी केला होता. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? हे पाहावे लागेल.

हेही वाचा – Prakash Ambedkar : माझ्या सर्व शंका आज प्रत्यक्षात आल्या; निवडणूक आयोगाच्या त्या निर्णयावर आंबेडकरांची टीका



Source link

Comments are closed.