आखाती देशात मृत्यू झालेल्या हिंदुस्थानीचा मृतदेह मायदेशी आणण्यास विलंब, कुटुंबीयांची न्यायालयात याचिका
ओमानच्या किनाऱ्याजवळ 4 मार्च रोजी एमटी एमकेडी व्योम या तेलवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू पावलेल्या मुंबईतील खलाशाचे पार्थिव अद्याप ताब्यात न मिळाल्याने कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे अंत्यसंस्कार करण्यासाठी पार्थिव ताब्यात मिळावे यासाठी केंद्र सरकारला न्यायालयाने आदेश द्यावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली असून सोमवारी 6 एप्रिल रोजी या याचिकेवर हायकोर्टात मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
बोटीवर खलाशी असलेले 25 वर्षीय दीक्षित सोलंकी ठार झाले. महिना उलटूनही पार्थिव ताब्यात न मिळाल्याने दीक्षितचे वडील अमृतलाल आणि बहीण मिताली यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर व ऍड माधवी अय्यपन यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, मृत झालेल्या कुटुंबातील सदस्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करणे हा मुलभूत अधिकार आहे. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे या प्रक्रियेत विलंब होत आहे. त्यामुळे न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी विनंती कुटुंबीयांनी केली आहे.
Comments are closed.