चंद्रपुरात बंदूक, जिवंत काडतूस, खंजीर जप्त; चार आरोपींना अटक

चंद्रपुरात ४ बंदूक, ३५ जिवंत काळतुसांसह ४ खंजीर बाळगल्याप्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना शहरातील गंजवॉर्ड परिसरात घडली. चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे.
या 4 जणांचा दरोडा टाकण्याची योजना होती, त्यासाठी ही तयारी करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपीना ताब्यात घेतले आहे. चंद्रपुरात येणारे ड्रग्स चिंतेचा विषय ठरला आहे. यामुळे चिंता वाढली असताना जिल्हात सापडणारी शस्त्रे पोलीस विभागाची चिंता आणखी वाढवत आहेत. या विरोधात पोलीस विभागागाकडून कारवार होत असली शस्त्र हातात घेऊन दहशत पसरविणारे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले आहेत. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रामटेके करीत आहे.
Comments are closed.