Gurdeep Kaur Vasu : अंपगत्वावर मात करणारी गुरदीप
अपगत्वांवर मात करुन यशाचे शिखर गाठलेली अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. अर्थात यासाठी मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असावी लागते हेही तितकचं खरं आहे. अपगंत्व केवळ शरीरात असतं मनात नाही याचंच उत्तम उदाहरण आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे इंदोरच्या गुरदीप कौर वासू हीचं. 35 वर्षीय गुरदीप कौर वासूला ऐकता, बोलता आणि पाहताही येत नाही. पण, तिने कठोर परिश्रमाने सरकारी नोकरी मिळवून इतिहास रचला आहे. अशा प्रकारची महिला सरकारी सेवेत रुजू होण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे. गुरुदीपच्या या यशाचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. पण, तिने हे करून दाखवलं आहे.
गुरदीपने जन्मानंतर काही महिन्यातच तिचा आवाज, प्रकाश आणि वाचा गमावली. पण, तिने परिस्थितीसमोर हार मानली नाही. तिन्ही इंद्रियांपासून वंचित असूनही तिने तिचे स्वप्न पूर्ण करत आज ती मध्य प्रदेशच्या वाणिज्यिक कर विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी बनून कोट्यवधी लोकांसाठी एक प्रेरणा बनली आहे.
जन्म
गुरदीपचा जन्म तिच्या जन्माच्या तारखेआधी झाला आहे. ज्य़ामुळे आरोग्याच्या विविध समस्यांनी तिला ग्रासले होते. गुरदीप पाच वर्षांची झाली तरीही तिच्या आरोग्यात कोणतेच बदल दिसून आले नाहीत. या सर्वांनंतर डॉक्टरांनी ती बोलू, ऐकू किंवा पाहू शकत नाही असे सांगितले. यासर्वानंतरही तिच्या कुटूंबियांनी तिचे प्रेमाने पालनपोषण केले तिच्याकडे कधीच ओझे म्हणून पाहिले नाही. तिच्या या यशात तिच्या आईचा आणि शिक्षकांचा सर्वात मोठा वाटा आहे, असे गुरदीप सांगते. गुरदीप तिची शिक्षिका मोनिका पुरोहित यांच्यासाहाय्याने सांकेतिक भाषेत बोलते.
इंदोरची हेलन केलर –
गुरदीप कौर वासू यांना इंदोरची हेलन केलर म्हणून ओळखले जाते. हेलन केलर ही एक प्रसिद्ध अमेरिकन लेखिका होती, जी ऐकू, बोलू आणि पाहू शकत नव्हती. पण, या परिस्थितीत हार न मानता तिने अनेक पुस्तके लिहिली होती.
देशातील पहिलीच घटना –
गुरदिपचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले आहे. ती बहु-अपंगत्व श्रेणीत चतुर्थ श्रेणीत काम करते. गुरुदीपच्या या यशानंतर देशात पहिल्यांदाच बोलू, ऐकू आणि पाहू शकत नसलेली महिला सरकारी सेवेत रुजू झाली, हा संपूर्ण दिव्यांगासाठी एक ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले जात आहे.
हेही पाहा –
Comments are closed.