केस स्टायसलिंग टिप्स: फेसबुक सारखे फासे
महिला त्यांचे लूक बदलण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे केस कापत असतात. केवळ केस कापल्याने चेहऱ्याचा संपूर्ण लूक बदलतो. मात्र महिला अनेकदा केस कापताना एक चूक करतात, ती म्हणजे चुकीची हेअर स्टाईल निवडणे. सलूनमध्ये जाऊन, महिला कोणत्याही प्रकारे हेअर स्टाईल करून केस कापून घेतात, जे त्यांच्या चेहऱ्याच्या आकारानुसार नसते. ज्यामुळे तुमचा लूक बिघडण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार कोणता हेअरकट तुमच्यावर चांगला दिसेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार वेगळा असतो. काहींचा चेहरा गोल असतो, काहींचा अंडाकृती तर काहींचा चौरस. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार केस कापले तर यामुळे तुमचा लूक संपूर्णत: बदलेल.
गोल चेहऱ्यासाठी
गोल चेहऱ्याच्या लोकांनी खूप लहान किंवा हनुवटीच्या लांबीचा बॉब कट करू नये. जर तुमचा चेहरा गोल असेल तर तुम्ही लेयर्ड कट, लाँग लेयर्ड आणि साइड बँग असलेले हेअरकट करावे. हे गोल चेहऱ्यावर उठून दिसतात आणि खूप छान लूक देतात. हे चेहरा लांब आणि सडपातळ दिसण्यास मदत करतात.
अंडाकृती चेहरे असलेल्यांसाठी
अंडाकृती चेहरा असलेल्या लोकांनी चेहरा झाकणारे केस कापणे टाळावे. अंडाकृती आकाराचे चेहरे असलेले लोक जवळजवळ कोणतेही हेअरकट ट्राय करू शकतात, जसे की लाँग वेव्हज, पिक्सी कट, बॉब कट किंवा स्टेप कट. हा फेस शेप परिपूर्ण समजला जातो त्यामुळे तुम्ही यावर अधिक प्रयोग करून पाहू शकता.
चौकोनी चेहऱ्याच्या आकारासाठी
ज्यांचा चेहरा चौकोनी आहे त्यांनी बँग्स किंवा जबड्याच्या लांबीचे हेअरकट करू नये. त्याऐवजी, तुम्ही सॉफ्ट लेयर्स, साइड-स्वीप्ट बँग्स किंवा लांब कर्ल ट्राय करू शकता. ते चेहऱ्याचा पसरलेला भाग झाकते आणि चेहरा यामुळे नाजूक दिसतो.
हार्ट शेप फेससाठी
हार्ट शेप फेस असणाऱ्या महिलांसाठी, हनुवटीच्या लांबीचा बॉब, साइड पार्टिंग किंवा फेदर कट योग्य ठरेल. हे कपाळाची रुंदी कमी करते आणि हनुवटीला बॅलेन्स स्वरूप देण्यास मदत करते. हार्ट शेप फेस असलेल्यांनी लेयर कट टाळावे.
लांब चेहऱ्यासाठी
ज्या महिलांचे चेहरे लांब आहेत त्यांनी फ्रिंज, साइड स्वीप्ट बॅंग आणि लेयर्ससह व्हॉल्यूम असलेले केस कापावेत. या कटमुळे त्यांचा चेहरा लहान आणि संतुलित दिसतो, ज्यामुळे त्यांना एक स्मार्ट लूक मिळतो.
हेही वाचा : Health Tips : हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करतील हे सुपरफूड्स
संपादित – तनवी गुडे
Comments are closed.