गाझामध्ये हमासची पुन्हा एकदा क्रूरता, भरचौकात 8 जणांवर झाडल्या गोळ्या

गाझा पट्टीवर नियंत्रण राखण्यासाठी हमासने आता क्रूर कदम उचलले आहे. आठ लोकांना भरचौकात फाशी दिली आहे. अमेरिकीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला युद्धबंदीचा इशारा दिला आहे. मात्र हमासने आठ जणांना इस्त्रायलचे सहकारी सांगून गोळी मारली. डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला युद्धबंदीचा इशारा देऊनही ही कारवाई करण्यात आली आहे.
इस्त्रायली सैनीक बाजूला झाल्यावर हमासने गाझामध्ये आपली पकड मजबूत केली आहे. ट्रम्प यांनी हमासला युद्धबंदी करावी अन्यथा अमेरिका त्यांच्यावर कारवाई करेल असा इशारा दिला होता. मात्र तरीही हमासने हे कृत्य केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये हमासचे बंदूकधारी आठ जणांवर गोळ्या झाडताना दिसत आहेत, ज्यांना या गटाने इस्रायली सहयोगी आणि गुन्हेगार म्हणून सांगितले आहे.
सोमवारी संध्याकाळी समोर आलेल्या व्हिडीओत आठ लोकांना भयंकर पद्धतीने मारण्यात आले आहे. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली दिसत असून गुडघ्यांवर रस्त्यावर बसायला भाग पाडले आहे. हमासने एक एक करुन त्यांना गोळी घातली. हमासने विना पुरावे ती लोक इंस्त्रायलसोबत काम करत असल्याचे सांगितले.
Comments are closed.