जोश हेजलवूडबाबत मोठी अपडेट समोर! ‘या’ सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता

ऍशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड (Josh hazelwood) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. दुखापतीमुळे तो पर्थमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. शेफील्ड शील्डच्या सामन्यात त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. 4 डिसेंबरपासून गाबा येथे होणाऱ्या पिंक बॉल कसोटीमध्येही हेजलवुड खेळू शकणार नाही. या आठवड्यात हेजलवुडने सिडनीमध्ये लाल चेंडूने नेट्समध्ये गोलंदाजी केली होती. त्यामुळे मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात त्याला संधी मिळू शकते, अशी आशा आहे.

हेजलवुड म्हणाला, रिकव्हरी हळूहळू होत आहे. मी गोलंदाजी करतो आहे, धावत आहे आणि सर्व काही व्यवस्थित चाललं आहे. परतण्याची नेमकी वेळ सांगणं कठीण आहे. मला वाटतं ‘रॉन’ (ऑस्ट्रेलियाचे कोच अँड्र्यू मॅकडोनाल्ड) यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं. आशा आहे की, मी मालिकेच्या शेवटच्या भागात खेळू शकेन. तोपर्यंत मालिकेचा कल आपल्या बाजूने असेल, अशी अपेक्षा आहे. दुसरी कसोटी 4 डिसेंबरपासून सुरू होईल आणि तो डे-नाइट सामना असेल.

हेजलवुडने वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्सबद्दल (Pat Cummins) बोलताना सांगितलं, तो गेल्या काही आठवड्यांपासून चांगली रिकव्हरी करत आहे. मी त्याला मंगळवारी पिंक बॉलने गोलंदाजी करताना पाहिलं. सगळं खूप छान दिसत होतं. कमिन्सने शुक्रवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर जोरदार ट्रेनिंग केलं. मंगळवारी त्याने न्यूझीलंडच्या क्रिकेट सेंट्रल मुख्यालयात गोलंदाजी सेशनमध्येही भाग घेतला, पण तो ऍशेस मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. मात्र, 17 डिसेंबरपासून अ‍ॅडलेडमध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत परतण्याची त्याच्याकडे चांगली संधी आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीसाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला असून कर्णधारपद स्टीव्ह स्मिथकडे (Steve Smith) आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी 14 सदस्यीय ऑस्ट्रेलियन संघ: स्कॉट बोलंड, अ‍ॅलेक्स केरी, ब्रेंडन डॉगेट, कॅमरून ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, जेक वेदरल्ड, ब्यू वेबस्टर

Comments are closed.