अटारी-वागा सीमेवर हँडशेक्सवर बंदी घातली

बीटिंग रिट्रीटबाबत नवीन निर्णय जारी : मैत्रीचे दरवाजे बंदच राहणार

वृत्तसंस्था/ अमृतसर/जालंधर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे गेल्या 12 दिवसांपासून बंद असलेला बीटिंग रिट्रीट सोहळा मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, भारताने हा सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अमृतसर येथील अटारी-वाघा बॉर्डर आणि फिरोजपूर येथील हुसैनीवाला बॉर्डर येथे बीटिंग रिट्रीट पुन्हा सुरू केले जाणार असले तरी गेट बंद राहणार असून दोन्ही देशांचे जवान एकमेकांशी हस्तांदोलनही करताना दिसणार नाहीत.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने अटारी सीमा बंद केली आहे. गेले काही दिवस रिट्रीट सेरेमनीच्या वेळीही भारत आणि पाकिस्तानचे दरवाजे उघडले गेले नाहीत. वास्तविक, रिट्रीट सेरेमनीच्या वेळी दोन्ही देशांचे प्रवेशद्वार उघडले जातात. सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि पाकिस्तानी रेंजर्स या दरवाज्यांजवळ येतात. तसेच बीएसएफ जवान आणि पाक रेंजर्स हस्तांदोलनही करतात.

Comments are closed.