Hang the accused santosh deshmukh’s brother dhananjay deshmukh demands
खंडणी ते खून प्रकरण, यात कटकारस्थान करणारे आरोपी आहेत, जे दोषी आहेत, त्यांना कलम 302 लावून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही माझी मागणी आहे, आणि त्यासाठी आवश्यक ते पुरावे देखील आपल्याकडे असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला.
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सगळ्या आरोपींना कलम 302 तसेच मकोका लावण्यात यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. याप्रकरणी आपण एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. खंडणी ते खून प्रकरण, यात कटकारस्थान करणारे आरोपी आहेत, जे दोषी आहेत, त्यांना कलम 302 लावून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही माझी मागणी आहे, आणि त्यासाठी आवश्यक ते पुरावे देखील आपल्याकडे असल्याचा दावा धनंजय देशमुख यांनी केला. (hang the accused santosh deshmukh’s brother dhananjay deshmukh demands)
खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित वाल्मी कराड याला आज केज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सीआयडी, न्यायालय, पोलीस, एसआयटी, मुख्यमंत्री अशा सगळ्या प्रशासकीय यंत्रणेकडून एकच अपेक्षा आहे ती म्हणजे या प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे. माझ्या भावाची हत्या झाली, या प्रकरणाची सुरुवात खंडणीतून झाली. त्यामुळे खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपी एकच आहेत. त्या सगळ्या आरोपींवर कलम 302 तसेच मकोका लावून सगळ्यांना फाशी दिली पाहिजे, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
हेही वाचा – Thackeray on Shah : या महाराष्ट्रात अमित शहांनी XX आणि गांडुळांची पैदास, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
संतोष देशमुख हत्याप्रकरणाला महिना उलटला तरीही त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वाल्मीक कराडविरोधात मकोका लावण्यात आलेला नाही. तसेच कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. यामुळे देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोगच्या गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलं होतं.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास एसआयटी आणि सीआयडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र एसआयटीमधील महेश विघ्ने आणि मनोज वाघ यांचे संशयित आरोपी वाल्मीक कराडसोबत संबंध आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी नि:पक्षपातीपणे होऊ शकत नाही, असे म्हणत दोन्ही अधिकाऱ्यांची बदली व्हावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होताना दिसत होती. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनीही याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर आता एसआयटीमधील दोन अधिकाऱ्यांना कायम ठेवत पाच नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा – Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आधीची एसआयटी रद्द
वाल्मिक कराडवर 302 गुन्ह्यासह मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ‘सीआयडी’ आणि ‘एसआयटी’ प्रमुखासह बीडचे अधीक्षक नवनीत कॉवत यांना फोन करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना केल्या आहेत.
Comments are closed.