Ratnagiri News – डझनभर हापूससाठी तीन हजार; बिटकीलाही पाचशेचा भाव
यंदा बाजारपेठेत अतिशय किरकोळ प्रमाणात हापूस आंबा दाखल झाला आहे. हापूस आंब्याची अडीच ते तीन हजार रूपये डझन दराने विक्री होत आहे. यंदा बिटकीलाही भाव आला असून बिटकी पाचशे रुपये डझन दराने विकली जात आहे.
यंदा वांझ मोहरामुळे फळधारणा झाली नाही. उन्हामुळे मोहर करपून गेल्यामुळे आंबा उत्पादन घटले आहे. त्यामुळे यंदा किरकोळ प्रमाणात हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. अडीच हजार ते तीन हजार रूपये दराने डझनभर आंब्याचा दर पाहून अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बिटकी तब्बल पाचशे रूपये दराने विकली जात आहे. पायरी आंबाही दोन ते अडीच हजार रूपये दराने विकला जात आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी एप्रिलच्या पंधरवड्यापर्यंत खिशाला परवडणाऱ्या आंब्याची वाट पहावी लागणार आहे.
Comments are closed.