भारतासाठी पाकिस्तानचा कोणता खेळाडू धोकादायक ठरणार? मॅच कोण जिंकणार, हरभजन सिंग म्हणाला…
हरभजन सिंग IND vs PAK नवी दिल्ली: टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान रविवारी आमने सामने येणार आहेत. ही मॅच श्रीलंकेतील कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या मॅचच्या संदर्भात दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. या मॅचबद्दल भविष्यवाणी देखील सुरु झाली आहे. टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं ही मॅच कोण जिंकू शकतं आणि त्या मॅचमध्ये भारतासाठी कोण धोकादायक ठरु शकतं हे देखील सांगितलं आहे.
पाकिस्तानच्या स्पिनरचा भारताला धोका
हरभजन सिगं यानं एएनआय सोबत बोलताना म्हटलं की पाकिस्तानचा एक स्पिनर आहे, तो चांगला स्पिनर आहे, त्याला थोडं पाहून खेळावं लागेल. मला वाटतं मॅचचा निर्णय निश्चित करण्यात त्याची भूमिका महत्त्वाची असेल. हरभजन सिंगनं तो कोणाबद्दल बोलतोय हे नाव सांगितलं आहे. पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक सध्या चर्चेत आहे. भारतीय टीमला हरभजन सिंगनं त्याच्याबाबत सतर्क केलं असावं, असा अंदाज वर्तवला जातोय. उस्मान तारिक यानं अमेरिकेविरोधात 27 रन देत 3 विकेट घेतल्या होत्या.
मॅचचा निकाल कोणाच्या बाजून लागणार याबाबत हरभजन सिंग बोलताना म्हणाला की, भारतीय टीम सक्षम आहे, चांगली टीम आहे, अपेक्षा आहे ते त्याप्रमाणे खेळतील जसे नेहमी खेळतात. भारत दबावाशिवाय खेळला तर विजयाचा झेंडा फडकावेल, असं हरभजन सिंग म्हणाला.
टी 20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्ताननं खूप नाटकं केली आहेत. पाकिस्तान सरकारकडून भारताविरोधात मॅच खेळणार नाही असं सांगण्यात आलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासोबत आयसीसीसोबत बैठक घेत मार्ग काढला. अखेर पाकिस्तान भारताविरुद्ध खेळण्यास तयार झालं आहे.
#पाहा | रांची, झारखंड: T20 विश्वचषक 2026 मधील भारत-पाकिस्तान आगामी सामन्याबद्दल, माजी भारतीय क्रिकेटर आणि AAP खासदार हरभजन सिंग म्हणाले, “भारत हा सामना जिंकेल. पाकिस्तानकडे एक स्पिनर आहे, तो चांगला फिरकीपटू आहे, आम्हाला त्याला सुरक्षितपणे खेळवायचे आहे… भारतीय संघ सक्षम आहे; तो एक… pic.twitter.com/OtnFyrDuq5
— ANI (@ANI) १३ फेब्रुवारी २०२६
टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
टी-20 विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान संघ : सलमान अली आगा (कर्नाधर), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक.
आणखी वाचा
Comments are closed.