खेळपट्टीवरून वाद पेटला, वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने टीम इंडियाला नको नको त्या भाषेत सुनवलं


भारत विरुद्ध सा 1ली कसोटी ईडन गार्डन्स खेळपट्टी वाद : भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात 30 धावांनी पराभव पत्करावा लागला. आता मालिकेतील दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे, त्याआधी ईडन गार्डन्सवरील खेळपट्टीवरून चांगलाच वाद पेटला आहे. भारताचे माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी ईडन गार्डन्सवर तयार झालेल्या कमी दर्जाच्या आणि गोलंदाजांना अति अनुकूल अशा खेळपट्टीची तीव्र शब्दांत टीका करताना त्याला ‘कसोटी क्रिकेटचा नाश’ असे म्हटले. त्यांच्या मते अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे खेळाडूंच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 124 धावांचे लक्ष्य भारताला पार करता आले नाही आणि सामना तीन दिवसांतच 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

हरभजन सिंग नेमकं काय म्हणाला?

हरभजन यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, “कसोटी क्रिकेटचं पूर्णपणे नुकसान केलं आहे. कसोटी क्रिकेटला भावपूर्ण श्रद्धांजली… गेली कित्येक वर्षे अशाच प्रकारच्या खेळपट्टीवर सामने होताना मी पाहत आलो आहे. टीम जिंकत असेल तर कुणी काही बोलत नाही. कुणी विकेट घेतो, मोठा हिरो बनतो आणि सगळ्यांना वाटतं की सर्व काही ठीक आहे. पण हा ट्रेंड आजचा नाही, अनेक वर्षांपासून चालू आहे आणि माझ्या मते हा पूर्णपणे चुकीचा आहे.”

2001 मध्ये ईडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजयात 13 विकेट्स घेतलेल्या हरभजन पुढे म्हणाले, आता या मुद्द्यावर विचार करण्याची वेळ आली आहे, कारण अशा पिचांमुळे खेळाडूंची प्रगती होत नाही. या प्रकारे खेळून तुम्ही कुठेच प्रगती करत नाही. बैलासारखे एकाच गिरणीत फिरत राहाल. जिंकता मात्र काही प्रत्यक्ष फायदा होत नाही. एक क्रिकेटर म्हणून तुमची प्रगतीच होत नाही.”

पुढे ते म्हणाले की, अशा खेळपट्टीमुळे तुम्ही नक्की कुठे पोहोचणार? आपल्या फलंदाजांना येथे धावा कशा करायच्या हेच समजत नाही. ते अशा अवस्थेत दिसतात की जणू त्यांना फलंदाजीच करता येत नाही. अशा वेळी कुशल गोलंदाज आणि कुशल फलंदाज यातला फरकच उरत नाही. परिस्थिती इतकी गोलंदाजांसाठी चांगली होते की कौशल्यापेक्षा खेळपट्टीमुळे खेळाडू बाद होत आहेत. टेस्ट क्रिकेट अशा पद्धतीने खेळताना पाहून खूप वाईट वाटते. आपण हे का करत आहोत, हेच कळत नाही.”

दुसरीकडे भारताचा माजी कसोटीपटू वसीम जाफर पण संतापले. ते म्हणाले की, वर्षभरापूर्वीच भारतीय संघाला मायदेशातील कसोटी मालिकेत न्यूझीलंडकडून 0-3 अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातून आपण अजूनही धडा घेतल्याचे दिसत नाही. तुम्ही अशा प्रकारची खेळपट्टी तयार करता, तेव्हा आपले फिरकीपटू आणि प्रतिस्पर्धी संघातील फिरकीपटू यांच्यात अंतरच राहत नाही. तुम्ही पुन्हा 2016-17 हंगामात होत्या, तशा खेळपट्ट्या तयार करण्यास सुरुवात करा. त्या वेळी विराट कोहली कर्णधार होता आणि इंग्लंड, न्यूझीलंडसारख्या संघांना भारताने धूळ चारली होती.

हे ही वाचा –

Shubman Gill : शुभमन गिलवरील दबाव कमी करा, प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वतंत्र कॅप्टन असावा, टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचा BCCI ला खळबळजनक सल्ला

आणखी वाचा

Comments are closed.