कुत्ते भौंके हजार, टॉमी चल निकल…; हरभजन सिंगचा संताप OUT OF CONTROL; सोशल मीडियावर खळबळ, नेमक

हरभजन सिंग आयपीएल 2026 : आयपीएल 2026 चा थरार जोरात सुरू झाला आहे. शनिवारी झालेल्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने (RCB) सनरायझर्स हैदराबादला (SRH) 6 विकेट्सने पराभूत केले. या विजयात विराट कोहली (Virat Kohli) आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनी शानदार अर्धशतकी खेळी करत संघाचा विजयाचा पाया रचला.

मात्र, या सामन्यानंतर चर्चेत राहिला तो केवळ सामना नाही, तर कमेंटेटर इयान बिशप (Ian Bishop) यांनी एक भावनिक कथा सांगितली. सनरायझर्स हैदराबादचा युवा खेळाडू अनिकेत वर्मा (Aniket Verma) याने 18 चेंडूत 43 धावांची झंझावाती खेळी करत संघाला 200 पार नेण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या खेळीमागची संघर्षमय कहाणीही तितकीच हृदयस्पर्शी आहे. लहानपणीच आईचं निधन झाल्यानंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि त्यानंतर त्याचं संगोपन काकांनी केलं. ही काहाणी बिशप यांनी सांगितल्यानंतर सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर याच विषयावरून वाद पेटला. Homie नावाच्या एका यूजरने हिंदी समालोचकांवर टीका करत नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu), वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांचा उल्लेख करत आक्षेपार्ह टिप्पणी केली. “इयान बिशप हिंदी छपरी कमेंटेटर्सपेक्षा जास्त भारतीय आहेत,” अशी पोस्ट त्याने केली होती.

या पोस्टवर हरभजन सिंग (Harbhajan Singh) संतापले आणि त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं, “हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार. चल निकल यहां से टॉमी!” यानंतर हा वाद आणखी चिघळला. संबंधित यूजरने पुन्हा आक्षेपार्ह भाषेत प्रतिक्रिया दिली आणि हरभजनला कमेंट्रीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. यावर हरभजन सिंह यांनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर देत सोशल मीडियावर खडाजंगी रंगली. एकूणच, मैदानावरील सामन्याइतकाच सामना आता सोशल मीडियावरही रंगताना दिसत आहे.

45 वर्षीय हरभजन सिंगने भारतासाठी 367 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत (103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी-20). त्याच्या नावावर कसोटीत 417, एकदिवसीय सामन्यांमध्ये 269 आणि टी-20 सामन्यांमध्ये 25 बळी आहेत. हरभजन सिंगने मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघांकडून 163 आयपीएल सामने खेळून 150 बळी घेतले आहेत.

हे ही वाचा –

RCB vs SRH Live Score : सर्वात यशस्वी संघ, पण 13 वर्षांचा तो एक डाग… ‘कलंक’ पुसण्यासाठी मुंबई सज्ज, KKRशी किती वाजता सामना?

आणखी वाचा

Comments are closed.