IND vs PAK: पाकिस्तानने यू-टर्न घेतलाच! भारत-पाक सामन्यावर हरभजन सिंगची सडेतोड प्रतिक्रिया
2026 टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना आता ठरल्याप्रमाणे 15 फेब्रुवारी रोजीच खेळवला जाईल. पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा आपला निर्णय मागे घेतला आहे. या घडामोडीवर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
हरभजन सिंगने म्हटले की, पाकिस्तानला हे समजायला खूप उशीर झाला की, ते स्पर्धेत नसले तरी टी-20 विश्वचषकावर काहीही परिणाम झाला नसता. पण भारताला मात्र या स्पर्धेतून बाहेर ठेवले जाऊ शकत नाही. पाकिस्तान जरी बांगलादेशला साथ देण्याच्या गप्पा मारत असला, तरी ते आपली भूमिका बदलून पलटी मारणार हे मला आधीच ठाऊक होते.
हरभजनने पुढे सांगितले की, पाकिस्तानने माघार घेतली असती तर त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला असता आणि त्यांच्यावर बंदीही आली असती. पैशांचा प्रश्न आला की पाकिस्तान खेळण्यासाठी तयार होईलच, याची मला खात्री होती. शेवटी तसेच झाले.
हरभजनच्या मते, हा यू-टर्न घेणं पाकिस्तानच्याच फायद्याचे आहे, कारण, आयसीसी (ICC) पाकिस्तानवर कडक कारवाई करू शकले असते. भविष्यात पाकिस्तानला कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे यजमानपद मिळाले नसते. या निर्णयामुळे होणारे नुकसान भरून काढणे पाकिस्तानला कठीण गेले असते.
आयसीसी, पीसीबी आणि बीसीबी यांच्या बैठकीनंतर पाकिस्तान सरकारने बहिष्काराचा निर्णय मागे घेतला आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय-व्होल्टेज सामना 15 फेब्रुवारीला कोलंबो येथे खेळवला जाईल.
Comments are closed.