पीएमडीटीए मानांकन सोमेश्वर लॉन टेनिस चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरिज टेनिस २०२६ स्पर्धेत शर्विल ठाकरे, वीर सावंत, कृष्णा पोखरना यांचे संघर्षपूर्ण विजय

सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ८,१०वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए मानांकन सोमेश्वर लॉन टेनिस चॅम्पियनशिप ब्रॉन्झ सिरिज २०२६ स्पर्धेत पहिल्या फेरीत शर्विल ठाकरे, वीर सावंत, कृष्णा पोखरना यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

सुस रोड येथील सनी स्पोर्टस किंग्डम टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत १० वर्षांखालील मुलांच्या गटात शर्विल ठाकरे याने स्मित ढाकेचा टायब्रेकमध्ये ५-४(४) असा संघर्षपूर्ण पराभव केला. वीर सावंतने नमन वाडीकरचा ५-४(५) असा कडवा प्रतिकार केला. कृष्णा पोखरना याने साहिल खटाळवर ५-४(१) असा विजय मिळवला.

अयांश मेयर व नमन राणे यांनी अनुक्रमे चैतराज उपाध्ये व पुरब मोदी यांचा ५-० असा एकतर्फी पराभव केला. अनय जोशी याने रिदवीन लांडगेला ५-१ असे पराभूत केले. अक्षय धोटेने वेदांश डिक्करचा ५-१ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. स्पर्धेचे उदघाटन सोमेश्वर फाउंडेशनचे व नगरसेवक सनी निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अथर्व अय्यर, ब्रिज सिंग, प्रसनजीत पॉल, स्पर्धा निरीक्षक सचिन वदगा आदी मान्यवर उपस्थित होते.

निकाल: १० वर्षांखालील मुले: पहिली फेरी:
नमन राणे वि.वि. पूरब मोदी 5-0;
शर्विल ठाकरे वि.वि.स्मित ढाके ५-४(४);
प्रयाण ढगे वि.वि.काव्यांश चौहान ५-१;
रेयांश सिंग वि.वि. पारुज ओमसे 5-0;
अनय जोशी वि.रिडविन लांडगे 5-1;
अक्षय धोटे वि.वि.वेदांश डिक्कर ५-१;
आयांश मेयर वि.वि.चैतराज उपाध्याय 5-0;
वीर सावंत वि.वि. नमन वाडीकर ५-४(५);
विराज कांबळे वि.वि.रितेश कानडजे ५-२;
कृष्णा पोखरणा वि.वि. साहिल खताळ 5-4(1);

Comments are closed.