संजू सॅमसनबद्दल राहुल द्रविड यांचं मोठं विधान! जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वर्ष 2024-25 मधील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी दिल्लीत ‘नमन अवॉर्ड्स’ (Naman Awards) सोहळ्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना बीसीसीआयने ‘लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड’ (जीवनगौरव पुरस्कार) जाहीर केला आहे. हा सन्मान स्वीकारण्यासाठी द्रविड 15 मार्च रोजी सकाळी दिल्लीत दाखल झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
राहुल द्रविड यांनी यावेळी विशेषतः संजू सॅमसनचे (Sanju Samson) कौतुक केले. संजूच्या कामगिरीबाबत द्रविड म्हणाले, इतक्या मेहनतीनंतर संजूला यशस्वी होताना पाहून खूप आनंद वाटतो. कष्टाचे फळ नक्कीच मिळते. संजूला वारंवार आपली प्रतिभा सिद्ध करताना पाहून अभिमान वाटतो.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा संजू संघात होता पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. 2026 वर्ल्ड कप स्पर्धेत सुरुवातीला त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी होती. मात्र, ‘सुपर-8’ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. त्याने फायनलसह सलग तीन सामन्यांत अर्धशतके झळकावली.
न्यूझीलंडविरुद्ध त्याने प्रत्येकी 89 धावांची जबरदस्त खेळी केली. संजू सॅमसनने टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक 321 धावा केल्या. त्याच्या या अष्टपैलू आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ या किताबाने गौरविण्यात आले.
Comments are closed.