हार्दिक की सूर्या; कोण सांभाळणार मुंबई इंडियन्सची धुरा? जाणून घ्या सविस्तर

आयपीएल २०२६ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. सर्व संघांचं एकच अंतिम लक्ष्य आहे, ते म्हणजे प्लेऑफ गाठणं. कारण कुठलाही संघ अजून प्लेऑफसाठी पात्र ठरलेला नाही. तर कोणताही संघ स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर पडलेला नाही. आज होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईस इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण स्पर्धेत टिकून राहायचं असेल, तर हा सामना जिंकावाच लागेल. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११? जाणून घ्या.

हार्दिक पांड्या खेळणार?

हार्दिक पंड्या खेळणार का? हा मुंबई इंडियन्ससमोर सर्वात मोठा प्रश्न असणार आहे. कारण लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. त्यानंतर मुंबईचे खेळाडू रायपूरला रवाना झाले होते. पण हार्दिक पंड्या रायपूरला गेला नव्हता. तो उशिराने संघासोबत जोडला गेला आहे. तो आज सामन्याआधी सराव करताना दिसून आला, तर स्पष्ट होऊन जाईल की तो आज खेळणार आहे. तसेच सूर्यकुमार यादव देखील परतला असून संघासोबत जोडला गेला आहे. त्यामुळे जर हार्दिक परतला नाही, तर त्याच्या जागी पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करताना दिसू शकतो.

हा सामना मुंबई इंडियन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना गमावला, तर मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फिल सॉल्ट या समाजातही पुनरागमन करताना दिसून येणार नाही. दमदार सुरुवात करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे टॉप २ मध्ये पुनरागमन करायचं असेल, तर हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स विजयाची लय कायम राखणार की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयाची हॅट्ट्रिक होणार? हे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते मुंबई इंडियन्स संघाची प्लेईंग ११:

रायन रिक्लेटन (यष्टिरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, नमन धीर, हार्दिक पंड्या (कर्ंधर) / शेरफेन रदरफोर्ड, विल जॅक, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर, शार्दुल ठाकूर.

Comments are closed.