IPL मधील वाईट क्षण आठवून हार्दिक भावूक, जाणून घ्या प्रतिक्रिया देताना काय म्हणाला?

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मागच्या वर्षी आयपीएल मध्ये खूप चर्चेत होता. त्याच्या खेळातील खराब प्रदर्शनामुळे चाहत्यांनी त्याला खूप ट्रोल केले होते. पण त्यानंतर वेळ बदलली आणि हार्दिक पांड्याने हार न मानता कठीण परिस्थितीवर मात करत तो मैदानावर उतरला आणि त्याची वेळ बदलवून टाकली. मागच्या वर्षी त्याला रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवण्यात आल्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर निराशा व्यक्त केली होती.

पण यानंतर 2024 च्या आयसीसी टी20 वर्ल्ड कप मध्ये हार्दिक पांड्याने खूप महत्त्वाची भूमिका निभावली आणि भारतीय संघाला 2024 चा वर्ल्डकप जिंकून दिला. त्यानंतर आता आयपीएल 2025 ची तो तयारी करत आहे. आता आशा आहे की, सर्व चाहते हार्दिक वर मनापासून प्रेम करतील. हार्दिक पांड्याने 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2025 हंगामाच्या आधी जियोहॉटस्टार वर म्हटले की, मी कधीच हार मानत नाही. माझ्या करिअरमध्ये काही अशा गोष्टी घडल्या जेव्हा माझे लक्ष जिंकण्यापेक्षा खेळामध्ये टिकून राहण्यावर होतं.

आयपीएलच्या मागच्या वर्षीच्या भयानक आठवणींना आठवताना हार्दिक पांड्या म्हणाला, चाहते माझ्यावर नाराज होते. त्यामुळे सातत्याने त्यावेळेस त्यांनी मला खूप त्रास दिला. तसेच मुंबई इंडियन्स संघ आयपीएलच्या मागच्या हंगामात शेवटच्या स्थानावर होता. पण हार्दिक पांड्याच म्हणणं आहे, त्यांचा संघ या हंगामात खूप मजबूत आहे आणि ते यावेळेस नक्कीच चांगली कामगिरी करतील.

पुढे हार्दिक म्हणाला, मला जाणीव आहे की माझ्यासोबत जे काय झालं त्या काळात माझं क्रिकेट माझा मित्र म्हणून माझ्या सोबत होत. त्यानंतर आम्ही वर्ल्ड कप मध्ये चांगली कामगिरी केली आणि जेव्हा आम्ही भारतात आलो तेव्हा चाहत्यांनी माझ्यावर पुन्हा आधी सारखं प्रेम केलं.

31 वर्षीय हार्दिकला पूर्ण विश्वास होता की, जर आपण पूर्ण मेहनतीने काम केले तर खेळामध्ये पुनरागमन नक्कीच करू. पुढे तो म्हणाला, मला अजिबात माहीत नव्हते की असं कधी होईल. पण जसं म्हटलं जातं की, नियतीची स्वतःची योजना होती आणि काही महिन्यांमध्येच गोष्टी पुन्हा पहिल्यासारख्या झाल्या. आत्ताच्या वर्ल्डकप मध्ये सुद्धा हार्दिक पांड्याने खूप प्रभावी कामगिरी केली.

मुंबई इंडियन्स संघ आयपीएलच्या मागच्या हंगामात अंतिम स्थानावर होता. पण या हंगामात ते सकारात्मक विचारांनी मैदानात उतरतील आणि निश्चित स्वरूपाने प्रत्येक आव्हानाचा सामना करतील, असे हार्दिक म्हणाला.
तसेच मुंबई इंडियन्स खूप अनुभवी संघ आहे आणि त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत ज्यांनी टॉप लेव्हलवर क्रिकेट खेळले आहे.

Comments are closed.