शिवम दुबेचा रेकॉर्ड फक्त काही सेकंदांचा पाहुणा! हार्दिक पांड्याने मारला टी-20 वर्ल्डकपमधील सर्व

हार्दिक पांड्याने ICC T20 विश्वचषक 2026 सर्वात लांब षटकार मारले: टी-20 वर्ल्डकप 2026 च्या 18व्या सामन्यात भारताने नामिबियावर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजीदरम्यान दोन पॉवर-हिटर्स हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांच्यातील सिक्सरची रोमांचक टक्कर पाहायला मिळाली. दोघांनीही लांबच लांब षटकार ठोकत स्पर्धेतील सर्वात मोठ्या सिक्सरच्या यादीत आपले नाव नोंदवले.

शिवम दुबेचा 107 मीटर षटकार….

भारतीय डावाच्या 15व्या षटकात शिवम दुबेने नामिबियाच्या गोलंदाज बर्नार्ड स्कोल्झच्या पहिल्याच चेंडूवर डीप मिडविकेटच्या दिशेने 107 मीटरचा जबरदस्त षटकार ठोकला. वेगवान चेंडूवर दुबेने ताकदीने फटका मारत हा चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये पाठवला. त्या क्षणी तो स्पर्धेतील सर्वात लांब षटकार ठरला.

हार्दिक पांड्याने अवघ्या 2 चेंडूत मोडला रेकॉर्ड (Hardik Pandya Hits ICC T20 World Cup 2026 Longest Six)

मात्र, काही क्षणांतच हार्दिक पांड्याने दुबेचा विक्रम मोडला. त्याच षटकात  बर्नार्ड स्कोल्झच्या गोलंदाजीवर लॉन्ग-ऑफच्या दिशेने 109 मीटरचा षटकार ठोकत हार्दिकने स्पर्धेतील सर्वात लांब षटकार आपल्या नावावर केला. हार्दिक पंड्याने अवघ्या 2 चेंडूत रेकॉर्ड मोडला. या सामन्यापूर्वी स्पर्धेतील सर्वात मोठा षटकार कामिंडू मेंडिसने 100 मीटरचा मारला होता. मात्र आता अव्वल दोन स्थानांवर भारतीय खेळाडूंचा कब्जा आहे.

हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी

दरम्यान, भारताने नामिबियावर 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या गट सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन आणि हार्दिक पंड्याच्या अर्धशतकांच्या जोरावर 20 षटकांत 9 बाद 209 धावा केल्या. प्रत्युत्तर नामिबियाचा संघ 18.2 षटकांत 116 धावांवर सर्वबाद झाला.  या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला.

हार्दिक पांड्याने 28 चेंडूत 52 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. हे त्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 25वे अर्धशतक ठरले. फलंदाजीनंतर गोलंदाजीतही त्याने 2 महत्त्वाचे बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सर्वांगीण कामगिरीबद्दल त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

हे ही वाचा –

Ind vs Pak T20 World Cup 2026 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; 4 षटक सामना फिरवणार?, नेमकं काय घडंल?

आणखी वाचा

Comments are closed.