Asia Cup: हार्दिक पांड्या आशिया कप 2025 स्पर्धेत इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडू!
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेसाठी हार्दिक पांड्याने (Hardik pandya) खास तयारी केली आहे. त्याने या स्पर्धेच्या आधी मुंबईत खूप प्रॅक्टिस केली आहे. आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध आहे. या स्पर्धेत हार्दिक ऐतिहासिक कामगिरी करू शकतो. जर त्याने 17 धावा केल्या तर तो आशिया कपमध्ये मोठी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरेल.
हार्दिक पांड्याने आतापर्यंत टी-20 आशिया कपमध्ये 11 विकेट घेतल्या आहेत आणि त्याने 87 धावा केल्या आहेत. जर हार्दिक या आशिया कपमध्ये 17 धावा करू शकला, तर तो टी-20 आशिया कपमध्ये 100 धावा आणि 10 विकेट दोन्ही करणारा पहिला खेळाडू ठरेल. आतापर्यंत कोणत्याही आशियाई खेळाडूने असे काही केले नाही. हार्दिक ही कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आहे.
हार्दिक पांड्या आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे खेळाडू आहे. त्याची संघातील भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. तो लोअर मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीसह वेगवान गोलंदाजीमध्येही दमदार कामगिरी करेल. भारताला तो दोन्ही क्षेत्रात मदत करू शकतो.
Comments are closed.