ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याला वनडे आणि टी-20 संघात स्थान नाही, मुख्य निवडकर्त्यांनी सांगितले कारण

BCCI ने शनिवारी, 4 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियात 19 ऑक्टोबरपासून भारतीय संघाला 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 5 सामन्यांची टी20 मालिका खेळायची आहे (IND vs AUS). स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik pandya) या दोन्ही मालिकांसाठी स्थान मिळाले नाही. संघ जाहीर झाल्यानंतर, टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर (Ajit Agarkar) यांनी याचे कारण सांगितले आहे.

संघ जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आगरकर म्हणाले, तो (हार्दिक पांड्या) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट नाही. वेळोवेळी कळेल की, तो किती काळ बाहेर राहील. तो COE (सेंट्रल ऑफ एक्सलेन्स) येथे रिहॅब सुरू करेल, त्यानंतरच माहिती होईल.

आगरकर यांनी हेही सांगितले की, तिलक वर्मा (Tilak Verma & Abhishek Sharma) आणि अभिषेक शर्मा वनडे टीममध्ये प्रवेश करण्यास अगदी जवळ आहेत, पण आत्तापर्यंत टॉप ऑर्डर निश्चित आहे. त्यांनी सांगितले, रोहित आणि शुबमन (Rohit Sharma & Shubman gill) डावाची सुरुवात करतील. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आहे.

जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) का वनडे मालिकेत निवडले गेले नाही, तेही आगरकर यांनी सांगितले, फक्त बुमराहच नाही तर मोहम्मद सिराजच्याही कार्यभाराचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. बुमराहला ऑस्ट्रेलियात वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.

त्यांनी सांगितले, एक स्ट्रॅटेजी असते. जेव्हा त्याला ब्रेक देता येईल, तेव्हा दिला जातो, कारण आपल्याला माहीत आहे की तो किती महत्त्वाचा आहे. टीमच्या हितासाठी हे आवश्यक आहे. जेव्हा त्याची गरज भासेल, तेव्हा तो नेहमी उपलब्ध असेल. हे फक्त त्याच्यासाठी नाही तर मोहम्मद सिराजसाठीही कार्यभाराचे व्यवस्थापन पाहणे आवश्यक आहे.

Comments are closed.