मुंबई इंडियन्सचे मैदान सोडले, हार्दिक पंड्या रातोरात गायब; बीसीसीआयचा मोठा गेमप्लॅन पडद्यामागे आहे
हार्दिक पांड्या बातम्या : आयपीएलच्या 19व्या हंगामातील लीग टप्प्यातील आठवा सामना अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत, ज्यामध्ये त्यांचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करत आहेय
2027 वर्ल्ड कपआधी BCCI चा मोठा गेम प्लॅन
भारतीय ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने दुपारच्या दोन सराव सत्रांमध्ये भाग घेतला नाही. तो जखमी नसून, सलग व्यस्त वेळापत्रकामुळे शरीराला थोडा आराम देण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. दरम्यान, आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. टीम मॅनेजमेंटने हार्दिकला आयपीएलनंतर होणाऱ्या वनडे सामन्यांसाठी पूर्ण 10 षटके टाकण्यास तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.
2023 नंतर झालेल्या सर्व आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाने दमदार कामगिरी केली आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2026 मध्ये भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ही हार आजही चाहत्यांच्या मनात ताजी आहे. आता पुढील आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2027 लक्षात घेऊन भारतीय संघाने तयारीला सुरुवात केली आहे.
याच पार्श्वभूमीवर हार्दिक पांड्याने आपला वर्कलोड वाढवण्यास सुरुवात केली आहे. 2027 च्या विश्वचषकमध्ये त्याच्याकडून पूर्ण 10 षटके टाकण्याची अपेक्षा आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, दक्षिण आफ्रिकेतील वेगवान आणि उंच उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर होणाऱ्या या स्पर्धेत हार्दिकची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांच्या मते, हार्दिक संघाला उत्तम संतुलन देतो. मात्र, त्याने टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी आवश्यक तेव्हा पूर्ण 10 षटके टाकण्याची तयारी दाखवावी लागेल. बहुतांश सामन्यांमध्ये त्याच्याकडून 6 ते 7 षटकेच टाकली जातील, पण गरज पडल्यास तो पूर्ण कोटा पूर्ण करू शकेल, अशी अपेक्षा आहे. तसेच, हार्दिकने आपल्या गोलंदाजीच्या अॅक्शनवरही काम केले असून विविधता (variation) राखताना वेग कमी होऊ नये यासाठी तो विशेष मेहनत घेत आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.