हार्दिक पांड्याची पुनरागमन; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी ‘इंडिया-ए’ संघाची घोषणा

हार्दिक पांड्या गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटपासून दूर असून, सध्या बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सीलन्समध्ये रिहॅब पूर्ण करत आहेत. राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी हार्दिक इंडिया-ए संघाकडून खेळणार असून, ऑस्ट्रेलिया-ए विरुद्धच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली आहे. बीसीसीआयने (BCCI) बुधवारी ऑस्ट्रेलिया-ए विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि मल्टी-डे (बहुदिवसीय) मालिकेसाठी इंडिया-ए संघाची घोषणा केली.

​बीसीसीआयने आपल्या अधिकृत निवेदनात सांगितले, “पुरुष निवड समितीने ऑस्ट्रेलिया-ए विरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी इंडिया-ए संघाची निवड केली आहे. या मालिकेत पुडुचेरी येथे दोन मल्टी-डे सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील.” मालिकेची सुरुवात २ मल्टी-डे सामन्यांनी होईल, ज्यातील पहिला सामना २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान खेळवला जाईल.

​हार्दिक पांड्याची मल्टी-डे मालिकेसाठी निवड झालेली नाही, त्याला ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. पहिला एकदिवसीय सामना ६ ऑक्टोबर, दुसरा ९ ऑक्टोबर आणि तिसरा ११ ऑक्टोबरला होईल. मात्र, हार्दिकचे या मालिकेत खेळणे त्याच्या फिटनेस रिपोर्टवर अवलंबून असेल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

​मल्टी-डे मालिकेच्या संघाबद्दल बोलायचे तर, कर्णधारपद देवदत्त पडिक्कलकडे सोपवण्यात आले असून साई सुदर्शनची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. एन. जगदीसन आणि कुमार कुशाग्र हे दोन यष्टीरक्षक संघात आहेत. वैशाख विजयकुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे, पण त्याचेही खेळणे फिटनेस रिपोर्टवरच अवलंबून असेल.

​एकदिवसीय मालिकेचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार असून पडिक्कल उपकर्णधार म्हणून संघात असेल. हार्दिक पांड्याबाबत सांगण्यात आले की, फिटनेस क्लिअरन्स मिळाल्यानंतरच तो सामन्यांमध्ये खेळू शकेल.

च्याऑस्ट्रेलिया-ए विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंडिया-ए संघ:

प्रियांश आर्य, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रजत पाटीदार, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, विप्रज निगम, अर्शिन कुलकर्णी, अरशद खान, नमन धीर, हार्दिक पांड्या*, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), गुरजापनीत सिंग, यश ठाकूर.

Comments are closed.