संस्कृत आणि शास्त्रांच्या संगमामुळे नवा भारत बनेल : बाबा रामदेव ; उत्तराखंडमध्ये शास्त्रोत्सव

पटांजली बातम्या: उत्तराखंडच्या हरिद्वार मध्ये पतंजली विद्यापीठात 62 व्या भारतीय शास्त्रोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की आपली शास्त्र केवळ पुस्तक नाही तर ब्रह्माडाच्या रहस्यांना समजून घेण्याचं साधन आहे.

मुख्यमंत्री पुष्कर धामी पुढे म्हणाले भारतीय संस्कृती आणि परंपरांची मुळं आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये आहेत. यामध्ये विज्ञान, योग, गणित, चिकित्सा आणि दर्शन यासारख्या अद्भुत ज्ञानाचे भांडार आहे, ते म्हणाले ऋषीमुनींनी लावलेल्या शोधांना केवळ संरक्षित करणेच नाही तर त्याला नव्या रूपाने विकसित करण्याची गरज आहे. धामी पुढे म्हणाले, या माध्यमातून संस्कृत आणि शास्त्रांचे ज्ञान देश आणि जगापर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे.

भारतीय ज्ञान परंपरेची पुनर्स्थापना करण्याची गरज : बाबा रामदेव

पतंजली विद्यापीठाचे कुलाधिपती आणि योग गुरु बाबा रामदेव यावेळी उपस्थित होते ते म्हणाले संस्कृती केवळ एक भाषा नाही तर संपूर्ण विश्वाला कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व पुरवण्याची क्षमता ठेवते. सनातन धर्म आणि भारतीय प्राचीन शास्त्रामध्ये सर्व ज्ञान विज्ञानाचा समावेश आहे. संस्कृत आणि संस्कृतीचा संगम सांगताना ते म्हणाले की सर्व भाषांचे मूळ संस्कृत मध्ये आहे. त्यातून भाषा निर्माण झाल्या याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी भारतीय ज्ञान परंपरेच्या पुनर्स्थापनेची गरज असल्याची भावना बाबा रामदेव यांनी व्यक्त केली.

संस्कृत तीर्थ आणि संस्कृतीचा गौरव : आचार्य बाळकृष्ण

पतंजली विद्यापीठाचे कुलपती आचार्य बाळकृष्ण यांनी संस्कृतला तीर्थ आणि संस्कृतीचा गौरव असल्याचं म्हटलं.  संस्कृतच्या महत्त्वावर त्यांनी प्रकाश टाकला. देशभरातून आलेल्या विद्वान आणि विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं.

30 राज्यातून आलेल्या प्रतिनिधींचा सन्मान

या कार्यक्रमात उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय शिक्षण मंत्री रमेशपोखरियाल निशंक यांनी म्हटलं की संस्कृत मध्ये सर्व ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान आहे. उत्तराखंडमध्ये संस्कृतला राज भाषेचा दर्जा मिळणे याशिवाय इतर क्षेत्रा राज्याच्या कामगिरीचा देखील त्यांनी उल्लेख केला. यावेळी 30 राज्यातून आलेल्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.

इतर बातम्या :

KKR vs RCB : एकेकाळच्या केकेआरच्या स्टारवर RCB विश्वास टाकणार, कोहलीसोबत मोठी जबाबदारी, कोलकाताची होमग्राऊंडवर नाकेबंदी करण्याचा बंगळुरुचा डाव

अधिक पाहा..

Comments are closed.