INDW vs WIW; हरमनप्रीत कौरने रचला इतिहास, शानदार खेळीने विश्वविक्रम मोडला

महिला क्रिकेटमध्ये भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील वनडे मालिका सुरू झाली आहे. वडोदरा वनडेमध्ये भारतीय संघ नव्या जर्सीत दिसला. ‘हरमनप्रीत कौर’च्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखाली भारतीय संघाने दमदार कामगिरी करत 314 धावा केल्या. यादरम्यान ‘स्म्रीती मानधना’ने (Smriti Mandhana) 91 धावांची खेळी केली. दरम्यान हरमनप्रीतने 34 धावांची महत्त्वाची खेळी खेळून इतिहास रचला.

महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत हरमनप्रीतने जगातील अनेक महान खेळाडूंना पराभूत केले आहे. हरमनने आतापर्यंत खेळलेल्या 139 सामन्यांमध्ये 3,749 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने 6 शतकांसह 19 अर्धशतके झळकावली आहेत. मात्र हरमनप्रीतने वेस्ट इंडिजची खेळाडू डिआंड्रा डॉटिनला मागे टाकले आहे. डॉटिनने 3,735 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या नॅट सायव्हर ब्रंटला मागे टाकले आहे. तिच्या 3,696 धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने आणखी एक खास रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे. कर्णधार म्हणून त्याने वनडेमध्ये 1,000 धावा पूर्ण केल्या आहेत. हरमनप्रीतने वडोदरा वनडे सामन्यात भारताकडून 23 चेंडूंचा सामना करत 34 धावा केल्या. दरम्यान तिने 3 चौकारांसह 1 षटकार ठोकला.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs ENG; भारत दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा…! ‘या’ स्टार खेळाडूचे पुनरागमन
Year Ender 2024; मराठी पाऊल पडते पुढे! स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राला दुसरे पदक मिळवून दिले
IND VS AUS; विराट कोहली एमसीजी मध्ये सचिन तेंडुलकरचा हा विक्रम मोडणार?

Comments are closed.