हरमनप्रीत कौरने रचला इतिहास! भारतीय संघासाठी अशी कामगिरी करणारी ठरली पहिलीच फलंदाज
भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये सुरु असलेला टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. हरमनप्रीत कौर ही भारताकडून टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. यादरम्यान तिने भारताची माजी कर्णधार मिताली राजचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
हरमनप्रीत कौर ही भारतीय संघाकडून महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. हरमनप्रीत कौरने आतापर्यंत ३४ डावात ७३० धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने मिताली राजचा ७२६ धावा करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. आता भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा हरमनप्रीत कौरच्या नावावर आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला सुरुवातीला २ मोठे धक्के बसल्यानंतर तिने स्मृती मानधनासोबत मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. यादरम्यान स्मृती मानधनाने अर्धशतकी खेळी केली. तर हरमनप्रीत कौर ३६ धावा करुन माघारी परतली.
Comments are closed.