84 वरून 7, मग 23! हरमनप्रीतच्या जर्सी क्रमांकामागील रहस्य; एका सल्ल्याने बदललं नशीब

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने 2025 च्या ICC Womens World Cup मध्ये भारतासाठी ऐतिहासिक विजय मिळवला. वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा नेतृत्व करणारी हरमनप्रीत सर्वत्र कौतुकास पात्र ठरली आहे. या यशाबरोबरच आता तिच्या जर्सी क्रमांकाची चर्चा देखील रंगली आहे.

हरमनप्रीत कौरने क्रिकेटमध्ये पदार्पण करताना जर्सी क्रमांक 84 निवडला होता. 1984 च्या दंगलीतील शहीदांच्या स्मरणार्थ तिच्या आईने हा क्रमांक निवडला होता. नंतर ती मैदानावर क्रमांक 7 घेऊन दिसली, जो तिच्या आक्रमक खेळीचे आणि निर्भय नेतृत्वाचे प्रतीक बनला.

नोव्हेंबर 2024 मध्ये मुंबईत भारताच्या नवीन एकदिवसीय जर्सी लाँचिंगदरम्यान, हरमनप्रीत कौरने क्रमांक 7 ऐवजी 23 घेण्याचा निर्णय घेतला. अंकशास्त्रज्ञ संजय बी जुमानी यांनी 23 क्रमांक तिच्यासाठी भाग्यवान ठरू शकतो, असे तिला सांगितले होते.

जर्सी क्रमांक बदलल्यानंतर, पुढच्या वर्षी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने ICC एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीतच्या 23 क्रमांकाच्या जर्सीची ही गोष्ट आत्मविश्वास, नेतृत्व आणि यशाचे प्रतीक बनली आहे.

हरमनप्रीत कौरचा जन्म 8 मार्च 1989 रोजी पंजाबमधील मोंगा येथे झाला. 36 वर्षीय हरमनप्रीत कौरने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केले. सध्या हरमनप्रीत कौरने 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने भारतासाठी 6 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 182 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने अनुक्रमे 200, 4409 आणि 3654 धावा केल्या आहेत.

Comments are closed.