36 वर्षीय हरमनप्रीत कौरचं लग्न झालंय?, कोणाला डेट करतेय?; नवीन टॅटूने लक्ष वेधलं, जाणून घ्या A


हरमनप्रीत कौर महिला विश्वचषक अंतिम २०२५: आयसीसी महिला विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात (INDW vs SAW World Cup Final 2025) भारतानं दक्षिण आफ्रिकेवर (India beat South Africa Women World Cup 2025 Final) 52 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं पहिल्यांदा आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकला. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हनमनप्रीत कौरचं (Harmanpreet Kaur) सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच हनमनप्रीत कौरच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही नेटकरी सोशल मीडियावर जाणून घेत आहेत.

हरमनप्रीत कौरचं लग्न झालंय की नाही?, हरमनप्रीत कौरचं शिक्षण किती?, याबाबत नेटकरी सोशल मीडियावर शोधत आहेत. दरम्यान, हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सध्या अविवाहित आहे आणि तिने नेहमीच तिचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियापासून दूर ठेवलंय. हरमनप्रीत कौरने लग्नाबाबत कधीही सार्वजनिकरित्या चर्चा केलेली नाही. हरमनप्रीत कौर सध्या फक्त क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले.

हरमनप्रीत कौरच्या टॅटूने वेधलं लक्ष- (Harmanpreet Kaur Married?)

हरमनप्रीत कौरला तिच्या पालकांसह आणि बहिणीसह तिच्या कुटुंबासह अनेकदा पाहिले जाते. हरमनप्रीत कौरला कुटुंबाने नेहमीच तिच्या कारकिर्दीला पाठिंबा दिला आहे आणि लग्न करण्यासाठी तिच्यावर कोणताही दबाव आणला नाही. 2025 च्या विश्वचषकापूर्वी, हरमनप्रीतच्या एका नवीन टॅटूने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष वेधले आहे. या टॅटूमध्ये तिच्या क्रिकेट प्रवासाचे चित्रण करणारा भौमितिक मंडला आहे आणि त्यात “अहं ब्रह्मास्मि” हा संस्कृत वाक्यांश देखील आहे, ज्याचा अर्थ “मी विश्व आहे” असा होतो.

हरमनप्रीत कौरची कारकीर्द- (Harmanpreet Kaur International career)

हरमनप्रीत कौरचा जन्म 8 मार्च 1989 रोजी पंजाबमधील मोंगा येथे झाला. 36 वर्षीय हरमनप्रीत कौरने 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हरमनप्रीत कौरने 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने भारतासाठी 6 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 182 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने अनुक्रमे 200, 4409 आणि 3654 धावा केल्या आहेत.

भारताचा 52 धावांनी दक्षिण अफ्रिकेवर विजय- (India W vs South Africa W Final Match)

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने 7 बाद 298 धावा केल्या. शेफाली वर्मा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज ठरली. तिने 78 चेंडूत 87 धावा केल्या, ज्यात 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शेफालीने मानधना (45) सोबत 104 धावांची सलामी भागीदारी केली. दीप्ती शर्मानेही 58 चेंडूत 58 धावा केल्या, रिचा घोषने 24 चेंडूत 34 धावा केल्या, जेमिमाह रॉड्रिग्जने 24 आणि हरमनप्रीत कौरने 20 धावा केल्या. भारताच्या 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज लॉरा वोल्वार्डने शतक केले. लॉरा वोल्वार्डने 98 चेंडूत 101 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि 1 षटकार होता. तर अ‍ॅनेरी डिर्कसेनने 35, सन लुसने 25 आणि तंजीम ब्रिट्सने 23 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून दीप्ती शर्माने सामना फिरवून टाकणारी गोलंदाजी केली. दीप्ती शर्माने उजव्या हाताच्या फिरकीपटूने 9.3 षटकांत 39 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. शेफाली वर्माने दोन आणि श्री चरणीने एक विकेट घेतली.

संबंधित बातमी:

INDW vs SAW World Cup Final 2025 Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेटच्या संघात सगळ्यात जास्त शिव्या कोण देतं?; हरमनप्रीत कौरने नाव जाहीर करुन टाकलं!

Shoaib Akhtar On India Womens Team WC Final 2025: भारताच्या मुली…टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरची पहिली प्रतिक्रिया; मनातलं सगळं बोलून गेला, काय काय म्हणाला?

आणखी वाचा

Comments are closed.