पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट.


हरमनप्रीत कौर भारत विरुद्ध इंग्लंड :आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय महिला संघाला आणखी एक पराभव पत्करावा लागला आहे. रोमांचक अशा सामन्यात इंग्लंडने भारताचा केवळ 4 धावांनी पराभव केला. या स्पर्धेत टीम इंडियाचा हा सलग तिसरा पराभव आहे, त्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग आता कठीण झाला आहे. इंग्लंडने भारतासमोर 289 धावांचे भव्य लक्ष्य ठेवले होते. मात्र, भारतीय फलंदाजांनी चांगली लढत देऊनही संघ 284 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पराभव पत्करावा लागला. याआधी भारताला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही पराभवाचा सामना करावा लागला होता. सामना संपल्यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर सामन्याचा टर्निंग पॉईंट सांगितला आहे.

पुन्हा एकदा पराभव! हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, “खरंतर, आमच्यासाठी स्मृतीची विकेट आमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. त्या क्षणानंतर मॅच पूर्णपणे फिरली. आमच्याकडे फलंदाज होते, पण तरीही हे असे कसे झाले अजूनही समजत नाही. पण इंग्लंडचं कौतुक करावं लागेल. त्यांनी सतत अचूक गोलंदाजी केली आणि विकेट घेत राहिले. शेवटच्या षटकांपर्यंत सर्व काही नियोजनानुसार चाललं होतं. पण शेवटच्या 5-6 षटकांत गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाहीत.

पुढे हरमनप्रीत म्हणाली की, तरीसुद्धा आम्ही चांगलं क्रिकेट खेळत आहोत, हार मानत नाही. फक्त ती शेवटची लाइन पार करणं बाकी आहे. मागच्या तीनही सामन्यांत आम्ही चांगलं प्रदर्शन केलं, पण दुर्दैवाने निकाल आमच्या विरोधात गेला. आता पुढचा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही ती लाइन पार करू अशी आशा आहे.

गोलंदाजीच्या कामगिरीवर हरमनप्रीत कौर म्हणाली की, आमच्या गोलंदाजीनंही उत्कृष्ट कामगिरी केली. नॅट आणि हीदर फलंदाजी करत असताना इंग्लंड खूप मजबूत स्थितीत दिसत होता. पण आम्ही ठरवलं होतं की जर त्यांना 300 च्या आत थांबवू शकलो, तर ते आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण या मैदानावर धावा झपाट्याने होतात, त्यामुळे आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बर्‍याच गोष्टी आम्ही योग्य केल्या, पण पुन्हा एकदा शेवटच्या पाच षटकांत काही चुका झाल्या.

हे ही वाचा –

Team India Semi Final Scenario : पराभवाची हॅट्ट्रिक, पण खेळ अजून संपला नाही! टीम इंडियाच्या आशा जिवंत, सेमीफायनलचं गणित बदलणार ‘हे’ 3 समीकरणं

आणखी वाचा

Comments are closed.