वर्सोवा पोलीस संघाचा विजय

वर्सोवा विधानसभा आयोजित हारून खान क्रिकेट प्रीमियर लीग आमदार चषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी वर्सोवा पोलीस ठाणे आणि आंबोली पोलीस ठाणे यांच्यात झालेल्या विशेष सेलिब्रिटी सामन्यात वर्सोवा पोलीस ठाण्याने विजय मिळवला.

स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी स्थानिक गटातील चार सामने खेळवण्यात आले, ज्यामध्ये क्रिकेटचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. पहिला सामन्यात आंबोली अटॅकर्सने वैशाली स्ट्रायकर्सचा 7 विकेट राखून पराभव मिळवला. तसेच म्हाडा मास्टर्सने गुलशन नगर जायंट्सविरुद्ध 33 धावांनी विजय मिळवला. अन्य एका सामन्यात व्हायब्रंट वर्सोवाने मॅग्नेटिक मोमीन नगरवर 22 धावांनी मात केली. ओशिवरा उस्ताद विरुद्ध बेहराम बाग पलटण. यांच्यात झालेल्या सामन्यात ओशिवरा विजयी ठरला. मोहसीन खान मॅन ऑफ द मॅच ठरला. युवा सक्षमीकरण, व्यसनमुक्तीविरुद्ध लढा आणि राष्ट्रीय एकात्मता हे प्रमुख उद्देश घेऊन वर्सोवाच्या इतिहासातील पहिली भव्य क्रिकेट स्पर्धा 28 नोव्हेंबरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संपुल, वीरा देसाई रोड, जोगेश्वरी पश्चिम येथे आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये 8 नामवंत संघांचा सामना रंगणार आहे.

Comments are closed.