मला नव्हे, हा सन्मान रूटला मिळायला हवा होता!

हिंदुस्थान-इंग्लंड कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा आक्रमक फलंदाज हॅरी ब्रूकने ‘मालिकावीर’ म्हणून निवड झाल्यानंतर हा सन्मान स्वीकारण्यास संकोच व्यक्त केला. या पुरस्काराचा खरा मानकरी ज्यो रूट आहे आणि त्याच्याच कामगिरीला हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले. पाच कसोटी सामन्यांची ही रोमांचक मालिका 2-2 अशा बरोबरीत संपली. दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांनी एकमेकांच्या संघातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली. इंग्लंडचे मुख्य

प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलम यांनी हिंदुस्थानी कर्णधार शुभमन गिलला, तर हिंदुस्थानी प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हॅरी ब्रूकला इंग्लंडकडून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जाहीर केला. मात्र ब्रूकने हा निर्णय स्वीकारताना विनम्रता दाखवत तो सन्मान जो रूटलाच मिळायला हवा होता, असे मत मांडले.

Comments are closed.