हॅरी ब्रूकचा ‘सुपरमॅन’ झेल; स्टोक्सचा रियाक्शन पाहून नेटकऱ्यांनाही धक्का! VIDEO

इंग्लंडने झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात धमाकेदार विजय नोंदवला. (ENG vs ZIM Test Match) तिसऱ्या दिवसअखेरच इंग्लंडने एक डाव आणि 45 धावांनी विजय मिळवत उन्हाळ्याच्या हंगामाची विजयी सुरुवात केली. या सामन्यात हॅरी ब्रूकने टिपलेला एकहाती झेलचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Harry Brook one-handed catch video viral)

दुसऱ्या डावातील 48व्या षटकात झिम्बाब्वेचा फलंदाज वेस्ली मढेवेरे झेलबाद झाला. कर्णधार बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर त्याने खेळलेला चेंडू टॉपएज होत थेट स्लिपमध्ये गेला. स्लीपमध्ये तैनात असलेल्या हॅरी ब्रूकने अतिशय जलद प्रतिक्रिया देत डाव्या हाताने हवेत उडी घेत अफलातून झेल टिपला. या झेल नंतर स्टोक्ससह सर्वांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. (Harry Brook Catch Video)

पाहा व्हिडिओ-

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडने पहिल्या डावात 565/6 धावा करुन डाव घोषित केला. ज्यात झॅक क्रॉली (124), बेन डकेट (140) आणि ऑली पोप (171) यांनी शतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. त्यानंतर झिम्बाब्वेचा पहिला डाव 265 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडने फॉलोऑन दिल्यानंतर झिम्बाब्वेचा दुसरा डाव 255 धावांवर आटोपला. ( England beat Zimbabwe an inning and 45 Run)

इंग्लंडकडून फिरकीपटू शोएब बशीरने सामन्यात एकूण 6 बळी घेत निर्णायक भूमिका बजावली. विजयानंतर बोलताना बेन स्टोक्स म्हणाला, “हंगामाची सुरुवात विजयाने करणे महत्त्वाचे होते. सुरुवातीला आमची गोलंदाजी संथ होती, पण नंतर आम्ही चांगली खेळपट्टी पकडली. झॅक आणि डकेटची आक्रमक शैली विरोधकांवर दबाव आणते. भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ही कामगिरी आत्मविश्वास वाढवणारी ठरेल.”

Comments are closed.