देवेंद्र पंतांनी आधी स्वतःच्याच घरात पसरलेली घाण आधी साफ करावी, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राज्यात इंधनाचा तुटवडा आहे, लॉकडाऊन लागणार आहे, गॅस पुरवठा खंडीत होणार आहे अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दरम्यान पुण्यातील कॅन्टोनमेंट परिसरातील हायवे पेट्रोलियम सेंटर (पूलगेट) या भाजप नेत्याच्या पेट्रोल पंपावरूनच इंधन उपलब्धतेबाबत खोटी माहिती पसरवल्याचे समोर आले आहे. त्यानंतर या पेट्रोल पंपावर कारवाई करून तेथील विक्री व इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फटकारले आहे.

”इंधन उपलब्धतेबाबत खोटी माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याप्रकरणी पुणे कॅन्टोनमेंट परिसरातील हायवे पेट्रोलियम सेंटर (पूलगेट) या पेट्रोल पंपावरील विक्री व इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला आहे. संबंधित पेट्रोल पंप भाजप नेते आणि ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे कोर कमिटी मेंबर अली दारूवाला यांचा आहे. भाजपचे नेतेच जनतेत अफवा पसरूवून जनतेत घबराट निर्माण होईल, त्या परिस्थितिचा उपयोग करून त्यांना आर्थिक फायदा कसा होईल हे बघत आहे. आणि दोषारोप करत आहेत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर. देवेंद्र पंतांनी दुसऱ्यांच्या घरी डोकावून बघण्याआधी स्वतःच्याच घरात पसरलेली घाण आधी साफ करावी”, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Comments are closed.