दक्षिण हिंदुस्थानने भाजपाचा विषारी विचार व नरेंद्र मोदींचे नेतृत्व नाकारले: हर्षवर्धन सपकाळ.
पाच राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर केला पण दक्षिण हिंदुस्थानातील जनतेने भाजपाचा विषारी, विखारी व देश तोडणारा विचार व नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वही नाकारले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या मदतीने सर्व मर्यादा, परंपरा, नियम यांना धाब्यावर बसवले. एनआयए, सीआरपीएफ, एन्काउटर स्पेशालिस्ट अधिकारी पश्चिम बंगालमध्ये पाठवून दडपशाहीचा वापर केला. पुन्हा एकदा भाजपाने गैरप्रकार करून पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवला आहे पण भाजपाची ही विषारी ताकद दक्षिण भारतात मात्र चालली नाही व मोदींचे नेतृत्वही चालले नाही.
केरळमध्ये काँग्रेस पक्षाचा विजय हा लोकशाही व संविधानाचा असून काँग्रेस पक्षाचा विचार व राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर केरळच्या जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. देशाला काँग्रेसचा विचारच तारणारा असून केरळच्या विजयाने काँग्रेसच्या देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे, ही ऊर्जाच काँग्रेसला आगामी काळात बळ देणारी ठरेल, असा विश्वास हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
Comments are closed.