टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT…; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले

हर्षित राणा आयपीएल 2026 मधून बाहेर : कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला आयपीएल 2026 (IPL 2026) सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या मालकीच्या केकेआरसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. राणा हा संघाचा महत्त्वाचा गोलंदाज मानला जात होता आणि त्याने आयपीएल 2024 व 2025 मध्ये कोलकात्यासाठी प्रभावी कामगिरी केली होती.

टी-20 वर्ल्डकप 2026 मधूनही बाहेर

हर्षित राणा हा केवळ गोलंदाजीच नव्हे तर खालच्या फळीमध्ये जलद धावा करण्यासाठीही ओळखला जातो. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दुखापतीमुळे तो आयपीएल 2026 मधून पूर्णपणे बाहेर पडला आहे. त्याला आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 पूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात दुखापत झाली होती. त्या दुखापतीमुळे तो वर्ल्ड कपमधूनही बाहेर पडला आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराज याला भारतीय संघात संधी मिळाली.

केकेआरसाठी राणाची कामगिरी

हर्षित राणा याने आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त कोलकाता नाइट रायडर्सकडूनच खेळ केला आहे. 2022 मध्ये त्याने केकेआरकडून आयपीएल पदार्पण केले. दिल्लीचा रहिवासी असलेला राणा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्या जवळचा मानला जातो. हर्षितने केकेआरकडून 34 टी-20 सामन्यांमध्ये 32 डावांमध्ये 40 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी 3/24 आहे.

आयपीएलमधील हर्षित राणाचा इकॉनॉमी रेट 9.51 आहे. त्याने त्याच सामन्यांमध्ये बॅटने 56 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 34 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे. त्याच्या जागी कोलकाता नाईट रायडर्स कोणाला करारबद्ध करेल हे येणारा काळच सांगेल.

दुखापत नेमकी कशी झाली?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात गोलंदाजी करताना हर्षित राणाच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्या सामन्यात त्याने फक्त एक षटक टाकले आणि त्यानंतर मैदान सोडावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याला शस्त्रक्रियेसाठी विश्रांती देण्यात आली होती. मात्र सध्या त्याच्या दुखापतीची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

आयपीएल 2026 साठी केकेआरचा संघ

अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, मनीष पांडे, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, रोवमन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, कॅमेरून ग्रीन, फिन अ‍ॅलन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सिफर्ट, ब्लेसिंग मुजारबानी, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र आणि आकाश दीप.

हे ही वाचा –

Kuldeep Yadav Wedding : मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं? पाहा VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.