गंभीरच्या लाडक्याच्या आकडेवारीमुळे टीम इंडिया टेन्शनमध्ये, कर्णधार सूर्याने लावला डोक्याला हात

एशिया कप 2025 साठी हर्षित राणा निवडला: आशिया कपसाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाची भारतीय टी20 संघात निवड झाल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. भारतासाठी फक्त एकच टी20I सामना खेळलेला हा गोलंदाज संघात कसा काय आला, असा प्रश्न उपस्थित झाला. कारण आयपीएल 2025 मध्ये त्याची कामगिरी अगदीच साधारण राहिला होती. आयपीएलच्या मागील हंगामात हर्षितने 13 सामन्यांत फक्त 15 गडी बाद केले आणि त्याचा इकॉनॉमी रेट तब्बल 10.18 इतका होता.

इंडिया-अ च्या इंग्लंड दौऱ्यानंतर काही काळ तो मुख्य कसोटी संघासोबत होता. पण भारतासाठी त्याचा मागील सामना फेब्रुवारीत चॅम्पियन्स ट्रॉफीत झाला होता. आशिया कपला आता थोडेच दिवस बाकी आहेत आणि कमकुवत कामगिरी असूनही हर्षितला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. मात्र तो अजूनही लयीत दिसत नाही. इंग्लंडहून परतल्यानंतर सतत स्पर्धांमध्ये खेळत असल्याचे त्याने सांगितले.

प्लेइंग-11 मध्ये खेळण्याची शक्यता कमी

हर्षित राणाला आशिया कपच्या सुरुवातीच्या सामन्यांत प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण वेगवान माऱ्यात बुमराहला साथ देण्यासाठी अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या उपलब्ध आहेत. शिवाय यूएईतील विकेट्स फिरकीपटूंना अनुकूल असतात. त्यामुळे संघात पेसर्सपेक्षा स्पिनर्सची संख्याही जास्त असू शकते.

गेल्या वेळी भारताने यूएईत चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळले तेव्हा संघाकडे पाच फिरकीपटूंचे पर्याय होते. हर्षितने आत्तापर्यंत फक्त एकच टी20 इंटरनॅशनल खेळला आहे. जानेवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून पदार्पण केले होते आणि 33 धावांत 3 बळी घेतले होते.

आकडेवारीमुळे टीम इंडिया टेन्शनमध्ये

हर्षित राणाने सांगितले की, आशिया कपसाठी DPL मधील सामने ही त्याच्यासाठी उत्तम तयारी ठरली, पण आकडेवारी मात्र वेगळीच कहाणी सांगते. भारतासाठी दोन कसोटी आणि पाच वनडे खेळलेला हर्षित DPL मध्ये आतापर्यंत आठ सामने खेळला असून त्याने फक्त 11 विकेट घेतले आहेत. त्याचा गोलंदाजी सरासरी 19.18 आहे तर इकॉनॉमी रेट 7.81 इतका आहे. सर्वोत्तम गोलंदाजीचा विचार करता (3/35)आठ संघांच्या या स्पर्धेत त्याचा परफॉर्मन्स सध्या टॉप-20 यादीतही नाही.

हे ही वाचा –

Hanuma Vihari News : 16 कसोटी सामने खेळणाऱ्या भारतीय खेळाडूने घेतला संघ सोडण्याचा निर्णय, बोर्डाकडून मागितली NOC, 15 वर्षांत चौथ्यांदा संघबदल

आणखी वाचा

Comments are closed.