हर्षवर्धन पाटलांनी लेकीसह घेतली गडकरींची भेट, दिल्लीत घडामोडींना वेग, नेमकी काय झाली चर्चा?

Harshvardhan Patil Met Nitin Gadkari : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी त्यांनी संत श्री तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गडकरी यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर अन्य काही मागण्या देखील केल्या आहेत.

अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत

सध्या ठीक ठिकाणची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत यासह पालखी मार्ग सुधारणे संदर्भातील अनेक मागण्या आज केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्याकडे नवी दिल्ली येथे भेट घेऊन पत्राद्वारे केल्या आहेत. या भेटी प्रसंगी मा.जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या. दरम्यान, पालखी मार्गाच्या निकृष्ट दर्जांच्या कामांची चौकशी करून, अपूर्ण कामे पूर्ण करणे व पत्रातील इतर मागण्या संदर्भात तातडीने संबंधितांना आदेश देण्यात येतील, असे नितीन गडकरी यांनी या भेटीत नमूद केल्याची माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.