मुंबईतील भूखंड लाडक्या शेठला कवडीमोल दराने, हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर हल्ला

भाजप महायुती सरकारने मुंबई विकायला काढली असून धारावी आंदण दिली आहे, विमानतळासह महत्त्वाचे व मोक्याचे भूखंड लाडक्या उद्योगपतीला दिले जात आहेत. दिल्लीवाल्यांनी त्यांचा लाडका शेठ उभा केला आहे त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कंबोज नावाचा नवा शेठ उभा करून त्याच्या घशात मुंबईतील भूखंड व एसआरएचे भूखंडही घातले आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. गिरण्यांच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या जात, असल्याचा आरोपही त्यांनी केला.
रविवारी घर हक्क परिषद
याविरोधात रणनीती ठरविण्यासाठी 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता टिळक भवन, दादर येथे घर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील घरांच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. काँग्रेस सरकारने सुरू केलेली परवडणारी घरे योजना अत्यंत उपयुक्त असून ही योजना व्यापक प्रमाणात राबविली पाहिजे. गिरण्यांच्या जमिनीवरील 33 टक्के सार्वजनिक उपक्रमावरील भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत. हा प्रकार थांबवून या भूखंडावर परवडणारी घरे योजना राबवावी यासाठी काँग्रेस पक्षाने 25 विविध संघटनांसोबत एक अभियान हाती घेतले, असे ते म्हणाले.
Comments are closed.