आमचं आंदोलन मोठं होऊ नये म्हणून सरकारने नाशिकच्या ढगफुटीची अफवा पसरवली, हर्षवर्धन सपकाळांचा फडण

देवेंद्र फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळ नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) हवामान विभागाने रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) आणि नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली होती.  हवामान विभागाने पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाला कारणीभूत असणारा भोवरा मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल असे भाकीत वर्तवले होते; परंतु हा भोवरा आता वेगळ्याच दिशेने वळाल्याने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरावर घोंगावणारे अतिवृष्टीचे आणि ढगफुटीचे संकट टळल्याचे चित्र आहे.

याच दरम्यान, अयोध्या श्रीराम मंदिर दान लूट प्रकरणाच्या (Ayodhya Ram Mandir) विरोधात नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिराबाहेर (Kalaram Temple) काँग्रेसतर्फे ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलन छेडण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या आंदोलनात भगवान रामाचे भजन करत सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी हातात ‘चौकीदार चोर है, देश लुटला आता रामाचे दान ही लुटले’ अशा आशयाचे बॅनर्स घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशाचा कारभार पारदर्शकपणे चालला पाहिजे. मात्र, या सर्वांना तिलांजली मिळाली आहे. माहिती अधिकाराचा भंग यांनी केला आहे. स्वतःचे बगलबच्चे राम मंदिरात बसवले आणि त्यावर डल्ला मारला आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पैसे चोरी गेले, याचा तपास लागला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही हे सत्याग्रह आंदोलन केलं आहे. महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात अजून आंदोलन उभारू, असे त्यांनी म्हटले.

Harshvardhan Sapkal: एसआयटीमध्ये मोदींचे हस्तक

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, चोरीतील गुन्हेगार चंपत राय यांच्या घरावर मोदी बुलडोझर चालवणार का? देश विकायला हे सर्वजण निघालेले आहेत. मंदिर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. एसआयटी घोषणा केलेली आहे. मात्र, या एसआयटीमध्ये मोदींचे हस्तक आहेत. जनतेला हिशोब मिळाला पाहिजे ही आमची सत्याग्रहामधून मागणी आहे.

Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: सरकारने नाशिकच्या ढगफुटीची अफवा पसरवली

आंदोलन चिरडले जावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढगफुटीची अफवा पसरवली. कुठलाही धोका नसताना त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी होणार असा फुगवटा त्यांनी तयार केला. मुख्यमंत्र्यांनी फसवणूक केली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सुलतान आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी काही देणं-घेणं नाही. राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे, खरं बोलले तर त्यांना मृत्यूची भीती आहे. सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून चौकशीला हे सरकार का घाबरत आहे? एसआयटीमध्ये बदमाश भरलेले आहेत. चंपत राय यांच्या विरोधात बोलायला सगळे घाबरत आहेत, हे सर्व एक थाली के  चट्टे-बट्टे आहेत. जो चोर आहे त्याला विश्वस्त मंडळात का ठेवले आहे? हा पैसा फोडाफोडीसाठी वापरला गेला आहे हे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

आणखी वाचा

Nashik Rain: पालघरमध्ये एका दिवसात आभाळ फाटल्यासारखा पाऊस पाडणारा ‘तो’ भोवरा नाशिकच्या दिशेने न जाता दुसरीकडेच सरकला, आता महाराष्ट्रातील ‘या’ भागावर अतिवृष्टीचं संकट?

Comments are closed.