हर्षवर्धन सपकाळांच्या बेडरूममध्ये घुसून हेरगिरी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांची पाळत असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील नाना चौक येथील सर्वोदय आश्रमात सपकाळ यांचा मुक्काम असतो. त्या आश्रमात सपकाळ यांच्या बेडरूममध्ये आज सकाळी एका साध्या वेशातील पोलिसाने घुसून टेहळणी केली. तिसऱ्यांदा असा प्रकार घडल्याचे सपकाळ यांचे म्हणणे आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. आज सकाळी साध्या वेशातील पोलिसाने थेट बेडरूममध्ये येऊन आपल्याला तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहात का? यासह अनेक प्रश्न विचारले. थेट बेडरूममध्ये कोणाच्या आदेशाने घुसलात असे विचारले असता त्या पोलिसाने वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगत वरिष्ठांशी फोनवर बोला असे सांगितल्याचे सपकाळ म्हणाले. विरोधकांवर पाळत ठेवण्याची भाजपची प्रवृत्ती आहे, परंतु अशा दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही, असे सपकाळ म्हणाले.

Comments are closed.