भाजप पदाधिकाऱ्यांनी साडी नेसवलेल्या मामा पगारेंना हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेतलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला साडीतील फोटो काँग्रेसचे डोंबिवलीतील ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे उर्फ मामा यांनी फेसबूकवर फॉरवर्ड केला. त्याची शिक्षा म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांना साडी नेसवून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर त्यांचा हात पकडून धक्काबुक्की करत जातिवाचक शिवीगाळही केली. यानंतर मामा पगारे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र टिळकनगर पोलिसांनी ही मागणी फेटाळली. याचा निषेध म्हणून शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी मामा पगारे यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेतले आणि स्टेजवर नेले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

कल्याण येथील पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांनी निष्ठावान कार्यकर्ते मामा पगारे यांना खांद्यावर घेतले आणि स्टेजवर उचलून नेले. त्यानंतर दोन्ही हात उंचावून काँग्रेस मामा पगारे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठी ठाम उभी असल्याचे सूचित केले.

Comments are closed.