सौंदाळा गावातील जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहचवा, हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
आज सर्वत्र जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढत जात असताना अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यात सौंदाळा ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे. हा आदर्श राज्यात सर्वदूर पोहचला पाहिजे, असे आवाहन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
अहिल्यानगरमधील जातमुक्त सौंदाळा गावाला भेट देऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी गावकऱयांचे अभिनंदन करत संवाद साधला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगाला भीती घालत आहेत, युद्धाची धमकी देत आहेत. देशात व राज्यातही भेद निर्माण करणारे, भीतीचे वातावरण पसरवणारे अनेक प्रवाह आहेत. अशा वातावरणात सौंदाळा गावाने जातमुक्तीचा ठराव करून ‘डरो मत’चा संदेश दिला असल्याचे सपकाळ म्हणाले. या वेळी गावचे सरपंच शरद आरगडे, कॉँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस प्रभावती घोगरे यांच्यासह कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.
Comments are closed.