Harshwadhan sakpal slams ajit pawar over vaishnavi hagawane news in marathi


बीडच्या मस्साजोगच्या घटनेतील आरोपी, पुण्याच्या पोर्शे कार ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गॅंग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींचे लैंगिक छळ करणारा शंतनू कुकडे, त्याचा सहकारी दीपक मानकर तर वैष्णवी हगवणे या भगिनीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत.

Congress : मुंबई : भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या काही काळात राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा महत्त्वाचा सहभाग आढळला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने कुटुंबाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. हुंड्यासाठी वैष्णवीचा सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार गटावर निशाणा साधला. (harshwadhan sakpal slams ajit pawar over vaishnavi hagawane news)

बीडच्या मस्साजोगच्या घटनेतील आरोपी, पुण्याच्या पोर्शे कार ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गॅंग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींचे लैंगिक छळ करणारा शंतनू कुकडे, त्याचा सहकारी दीपक मानकर तर वैष्णवी हगवणे या भगिनीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणातले आरोपी अजितदादांच्या पक्षातलेच कसे ? प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – Rahul Gandhi : तुमचे रक्त केवळ कॅमेऱ्यासमोरच का उसळते? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

या सगळ्या गुंडांचे पालकत्व सत्ताधाऱ्यांनी घेतले आहे. त्यामुळे अशी घृणास्पद कृत्ये करण्याची यांची हिंमत होते, असेही सपकाळ म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाचा असंवेदनशीलपणा पुन्हा दिसला आहे. महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर एक निष्पाप जीव वाचला असता. पण आयोगाच्या अध्यक्षांना महिलांच्या सुरक्षेपेक्षा राजकारणात चमकण्यातच जास्त रस असल्याने राज्यात महिला अत्याचाराच्या दुर्देवी घटना घडत असल्याची टीका सपकाळ यांनी केली.

अर्जुन खोतकर आणि त्यांच्या पीएला अटक करण्याची मागणी

राज्यातील महायुतीचे सरकार हे भ्रष्टाचाराच्या पायावर उभे असून या सरकारमधील सहभागी मंत्री, आमदारांकडून फक्त लूट सुरू आहे. धुळे दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीतून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली. ही रक्कम या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर आणि त्यांच्या पीएवर गुन्ह दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच शिंदेंच्या सर्व आमदारांची लाचलुचपत विभाग, ईडी आणि प्राप्तीकर विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी सपकाळ यांनी यावेळी केली.



Source link

Comments are closed.